आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल दराचा उच्चांक; देशात सर्वात महाग Petrol मुंबईत, डिझेल हैदराबादमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेट्रोलच्या किंमतीत सोमवारी 33 ते 34 पैशांनी तर डिझेलच्या किंमती 25 ते 27 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. मागील काही आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीही सतत वाढत आहेत. सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे.  मुंबईत आज पेट्रोल 84.40 रुपये झालs आहे. तर मुंबईत डिझेलच्या किंमती 72.21 रुपये प्रतिलिटर आहे. 

 

 

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 76.57 रुपयांवर पोहोचले आहे. तर येथे डिझेलच्या किंमतीनी उच्चांक गाठला असून प्रतिलिटर 67.82 रुपयांवर पोहोचले आहे. हैदराबादमध्ये डिझेल सगळ्यात महाग म्हणजेच 73.72 रुपये प्रति लीटरने मिळत आहे.

 

 

चार महानगरांमधील पेट्रोलचे दर

शहर सोमवारचे भाव (रु./लीटर) दरवाढ (14 मे ते 21 मे पर्यंत)
दिल्ली 76.57 1.94 रुपये
मुंबई 84.40 1.92 रुपये
कोलकाता 79.24 1.92 रुपये
चेन्नई 79.47 2.04 रुपये

(सोर्स: इंडियन ऑयल)

 

पुढे वाचा: आणखी किती वाढू शकतो पेट्रोलचा दर...

 

बातम्या आणखी आहेत...