Home | Business | Share Market | petrol price can be cut by rs 25 per litre says p chidambaram

सरकारची इच्छा असल्यास पेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते: पी. चिदंबरम

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 23, 2018, 03:03 PM IST

देशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थ

  • petrol price can be cut by rs 25 per litre says p chidambaram

    नवी दिल्ली- देशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. इतकी कपात करता येणे शक्य असले तरी सरकार या दिशेने पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन दरावर त्यांनी सलग ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली.

    पेट्रोलचे दर 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण सरकार असे करणार नाही. ते पेट्रोलचे दर 1 किंवा 2 रूपयांनी कमी करून लोकांची दिशाभूल करतील, असे ट्विट त्यांनी केले. गत नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. चिदंबरम म्हणाले की, केंद्र सरकार प्रत्येक एक लिटरमागे 25 रूपये जास्त घेत आहे. हा थेट नागरिकांचा पैसा आहे. क्रूड ऑईलच्या किमतीवर सरकार एका लिटरमागे 15 रूपये वाचवत आहे. त्यानंतर ते 10 रूपयांचा अतिरिक्त कर लावत असल्याचे ते म्हणाले.

  • petrol price can be cut by rs 25 per litre says p chidambaram

Trending