Home | Business | Share Market | PM Narendra Modi gives big employment opportunity through this scheme

कॉंग्रेसला जमले नाही, पण मोदींनी करुन दाखवले, मिळवा एवढे मासिक इन्कम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 18, 2017, 05:49 PM IST

युपीए सरकारने ही स्कीम सुरु केली होती. पण सुरु झाल्यानंतर लगेच ती फ्लॉप झाली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या स्कीमचा समावे

 • PM Narendra Modi gives big employment opportunity through this scheme
  नवी दिल्ली-मोदी सरकारने केवळ ही स्कीम हीट केली नाही तर या स्कीमच्या माध्यमातून हजारो लोकांना मंथली २५ ते ३० हजार रुपये कमविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या स्कीमचा वापर करुन रेग्युलर ३० हजार रुपये कमाई करणे शक्य झाले आहे. तुम्ही गावात असाल, लहान शहरात असाल किंवा मेट्रोत. आम्ही बोलतोय ते मोदींच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्राबद्दल.
  युपीए सरकारने ही स्कीम सुरु केली होती. पण सुरु झाल्यानंतर लगेच ती फ्लॉप झाली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या स्कीमचा समावेश सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत करण्यात आला. सर्वसामान्य लोकांना अनेक प्रकारचे लाभ पोहोचणे हा या स्कीमचा उद्देश आहे. या स्कीमच्या माध्यमातून अनेक नागरिक रेग्युलर इन्कम मिळवत आहेत. स्कीम अंतर्गत सरकारच्या मदतीने आतापर्यंत २७७५ स्वस्त औषधांची दुकाने सुरु करण्यात आली आहेत. दुकान उघडण्यासाठी सरकार २.५ लाख रुपये अनुदानही देते. तुमच्याकडेही या स्कीममध्ये सहभागी होण्याची संधी आहे.
  पुढील स्लाईडवर वाचा, मोदी सरकारने कशी केली फ्लॉप स्कीम हिट... तुम्ही कसा उचलू शकता फायदा...

 • PM Narendra Modi gives big employment opportunity through this scheme

  कोण उचलू शकतो लाभ
  - पहिल्या कॅटेगरीत कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर स्टोअर ओपन करु शकतात.
  - दुसऱ्या कॅटेगरीत ट्रस्ट, एनजीओ, प्रायव्हेट हॉस्पिटल, सोसायटी आणि सेल्फ हेल्प ग्रुप स्टोअऱ ओपन करु शकतात.
  - तिसऱ्या कॅटेगरीत राज्य सरकारने नॉमिनेट केलेली एजंंसी स्टोअर ओपन करु शकते.
  - दुकान उघडण्यासाठी १२० वर्गफुट एरिया असलेले दुकान हवे.

   

  सरकार देणार २.५ लाख रुपये
  -जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी सुमारे २.५ लाख रुपये भांडवल लागेल. केंद्र सरकार त्यातील संपूर्ण म्हणजेच २.५ लाख रुपये अनुदान देईल.
  - सेंटर उघडणाऱ्याला केंद्र सरकारकडून ६५० पेक्षा जास्त औषधी उपलब्ध करुन देण्यात येतील.
  - यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी आणि आवेदन फी रद्द करण्यात आली आहे.

 • PM Narendra Modi gives big employment opportunity through this scheme

  असे होईल इन्कम
  - तुम्ही तुमच्या केंद्राच्या माध्यमातून जेवढी औषधी विकाल त्याच्या २० टक्के तुम्हाला कमिशन दिले जाईल.
  - ट्रेड मार्जिनसह सरकार एकूण विक्रीवर मासिक इन्सेटिव्हही देईल. तुमच्या बॅंक खात्यात ते जमा होईल.
  - त्यामुळे दुकानदाराचा दुप्पट फायदा होईल. तुम्ही महिन्यात एका लाख रुपयांच्या औषधी विकल्या तर मासिक २५ ते ३० हजार रुपये इन्कम होईल.
  - कमिशनची कोणतीही मर्य़ादा नाही. जेवढी विक्री तेवढे जास्त कमिशन मिळेल.

 • PM Narendra Modi gives big employment opportunity through this scheme

  कसे मिळतील २.५ लाख रुपये
  - सेंटर सुरु केल्यावर तुम्हाला आधी १ लाख रुपयांची औषधी खरेदी करावी लागेल. सरकार त्यानंतर त्याचे पेमेंट करेल.
  - दुकानाचे फर्निचर तयार करण्यासाठी सरकार तुम्हाला १ लाख रुपयांचे अनुदान देईल. तुमच्या बॅंक खात्यात ते जमा होईल.
  - कॉम्प्युटर आदी सेटअप तयार करण्यासाठी सरकार ५० हजार रुपयांचे अनुदान देईल.
  कसे मिळेल इन्सेटिव्ह
  - प्रत्येक महिन्याला औषधींच्या विक्रीवर इन्सेटिव्ह दिला जाईल. तो १० टक्के ठेवण्यात आला आहे.

 • PM Narendra Modi gives big employment opportunity through this scheme

  असा करा अर्ज
  - स्टोअर उघडण्यासाठी तुमच्याकडे रिटेल ड्रग सेलचे लायसन्स असणे अनिवार्य आहे. लायसन्स जनऔषधी स्टोअरच्या नावाने हवे.
  - ज्याला हे स्टोअर ओपन करायचे आहे त्याने http://janaushadhi.gov.in/ यावर जाऊन फॉर्म डाऊनलोड करु शकतो.
  - अप्लिकेशन ब्युरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर यांच्या नावाने पाठवावे लागेल.
  - याची माहिती ब्युरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेेकिंग ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 • PM Narendra Modi gives big employment opportunity through this scheme

  अशी हिट झाली योजना
  - मोदी सरकारने या स्कीममधील अनुदान १.५ ऐवजी २.५ लाख रुपये केले.
  - दुकानदारांना मिळणारे कमिशन १५ ऐवजी २० टक्के करण्यात आले.
  - आवेदन फी आणि प्रोसेसिंग फी रद्द करण्यात आली.
  - प्रत्येक महिन्याला इन्सेटिव्ह देण्याची घोषणा करण्यात आली.
  - त्यामुळे मेडिकलची संख्या ८० हून थेट २७७५ वर गेली.

Trending