Home | Business | Share Market | register on this portal for vacancy without any fee

नोकरीसाठी या पोर्टलवर करा रजिस्ट्रेशन, 7 लाख उमेदवारांना मिळाली संधी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 18, 2017, 02:38 PM IST

मुंबई- तुम्ही बेरोजगार आहात किंवा नोकरी बदलायची आहे तर तुम्ही अनेक प्रायव्हेट वेबसाईटवर जॉबसाठी रजिस्ट्रेशन करु शकता.

 • register on this portal for vacancy without any fee

  मुंबई- तुम्ही बेरोजगार आहात किंवा नोकरी बदलायची आहे तर तुम्ही अनेक प्रायव्हेट वेबसाईटवर जॉबसाठी रजिस्ट्रेशन करु शकता. त्यासाठी तुम्ही काही पैसेही खर्च करावे लागतात. तरीही योग्य नोकरी मिळत नाही. पण आता केंद्र सरकारने एक पोर्टल तयार केले आहे. तेथे रजिस्ट्रेशन करण्याचा खर्च येणार नाही. तसेच चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यताही जास्त असेल. या पोर्टलवर तुम्ही जॉबची जाहिरातही देऊ शकता. त्यामुळे कंपन्यांनाही या पोर्टलचा फायदा होताना दिसून येईल.

  या पोर्टलचे नाव नॅशनल करिअर सर्व्हिस (एनएससी) असे आहे. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की पोर्टलशी तुम्ही कसे जुळू शकता. यावर रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला कोणता फायदा होईल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ७ लाख लोकांनी याच्या माध्यमातून संधी मिळाली आहे.

  काय आहे एनएससी
  मिनिस्ट्री ऑफ लेबर अॅण्ड एम्प्लॉयमेंटने तयार केलेले हे नॅशनल जॉब पोर्टल आहे. येथे नोकरी हवी असणारी आणि नोकरी ऑफर करीत असलेले एम्प्लॉयर दोघेही अर्ज अपलोड करु शकतात. यावर सरकारी आणि प्रायव्हेट दोन्ही प्रकारच्या व्हॅकेन्सीची माहिती मिळू शकते. या शिवाय स्किल प्रोव्हायडर, काऊन्सलर, प्लेसमेंट एजंसी, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट रजिस्ट्रेशन करु शकतात.

  काय आहे अनिवार्य
  या पोर्टलवर कोणीही रजिस्ट्रेशन करु शकते. संबंधित उमेदवाराचे वय १४ वर्षांपेक्षा जास्त असावे. रजिस्ट्रेशन करणारी व्यक्ती शिकलेली असावी, अशी काही अट नाही. कुणीही यावर अर्ज अपलोड करु शकतात.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या या पोर्टलवर कसे करावे लागेल रजिस्ट्रेशन....

 • register on this portal for vacancy without any fee

  आयडी आहे आवश्यक
  या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी युनिक आय़डीची गरज आहे. यात आधार क्रमांक, पॅन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर कार्ड आदींचा समावेश आहे. यातील कोणताही आयडी असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करु शकता.

   

 • register on this portal for vacancy without any fee

  कसे करणार रजिस्ट्रेशन
  www.nsc.gov.in असे या पोर्टलचे नाव आहे. तुम्हाला साईन अपवर क्लिक करुन डिटेल्स अपलोड करावे लागतील. त्यानंतर तुमच्या रजिस्टर फोन नंबरवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. तो फीड केल्यावर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

   

 • register on this portal for vacancy without any fee

  कशी मिळणार नोकरी
  रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या कंसोलमध्ये सर्च ऑप्शन येईल. तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार आवश्यक व्हॅकेन्सी बघू शकाल. पोर्ठलवर लिस्टेड व्हॅकेन्सीवर अप्लाय  करता येईल. ऑनलाईनच तुम्हाला अप्लाय करता येईल.

   

 • register on this portal for vacancy without any fee

  अशी मिळेल सुचना
  तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केले. त्यावेळी तुम्हाला एकही जॉब योग्य वाटला नाही. त्यानंतर तुम्ही ऑफलाईन झाले. तरी तुमच्या अकाऊंटवर नोटिफिकेशन, ईमेल आणि एसएमएस येत राहिल. त्यामुळे तुमची संधी मिस होणार नाही.

   

Trending