Home | Business | Share Market | ril income crosses 1 lakh cr rs in q4

RIL चे उत्पन्न 1 लाख कोटीहून अधिक, जिओला Q4 मध्ये 510 कोटींचा नफा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 27, 2018, 08:26 PM IST

रिलायन्स इंडस्ट्रीजला आर्थिक वर्ष 2018 ची चौथी तिमाही अतिशय उत्तम ठरली आहे. या काळात कंपनीचे उत्पन्न पहिल्या

 • ril income crosses 1 lakh cr rs in q4

  नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीजला आर्थिक वर्ष 2018 ची चौथी तिमाही अतिशय उत्तम ठरली आहे. या काळात कंपनीचे उत्पन्न पहिल्यांदाच 1 लाख कोटीच्या पलिकडे गेले आहे. चौथ्या तिमाहीत आरआयएलचा नफा 9435 कोटी रुपये राहिला आहे. तर या दरम्यान टेलिकॉम वर्टिकल जिओचा नफा 504 कोटी रुपये राहिला आहे. चौथ्या तिमाहीत आरआयएलचा जीआरएम 11 डॉलर प्रति बॅरल राहिला आहे. कंपनीने प्रति शेअर 6 रूपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

  -कंपनीचा PBDIT पहिल्यादाच 10 अब्ज डॉलरच्या पलिकडे

  -आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान कंपनीचा नेट रेवेन्‍यू 4,30,731 कोटी रुपये

  -यात 30.5 टक्के वाढ

  -आर्थिक वर्ष 2016-17 दरम्यान कंपनीचा नेट रेवेन्‍यू 3,30,180 कोटी रुपये होता.

  -आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान कंपनीला 36,075 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट झाला.

  -मागील वित्‍त वर्षाच्या तुलनेत नेट प्रॉफिटमध्ये 20.6 टक्के वाढ

  पुढे वाचा: Jio ला झाला किती फायदा

 • ril income crosses 1 lakh cr rs in q4

  Jio ला 510 कोटी रुपयांचा फायदा

  चौथ्या तिमाहीत रिलायन्स Jio चा नफा वाढून 510 कोटी रुपये झाला. तिसऱ्या तिमाहीत तो 504 कोटी रुपये होता. तर या दरम्यान Jio चे उत्पन्न 6879 कोटींनी वाढून 7128 कोटी झाले. Jio चे आतापर्यंत 18.66 कोटी ग्राहक झाले आहेत. कंपनीने सांगितले की या तिमाहीत ग्राहकांनी 506 कोटी GB डाटा खर्च केला.या प्रकारे यात मागील तिमाहीच्या तुलनेत 17.4 टक्के वाढ दिसून आली.

 • ril income crosses 1 lakh cr rs in q4

  रिटेल आणि डिजिटलमध्ये विकासाच्या अपार संधी

  रिझल्‍टनंतर मुकेश अंबानी म्हणाले की, रिटेल आणि डिजिटल क्षेत्रात विकासाच्या अपार संधी आहेत. या क्षेत्रात गुंतवणूकदारांना फायदा होईल. मुकेश अंबानी म्हणाले की Jio पहिल्याच वर्षी नफ्यात आला. ते म्हणाले की, Jio चे कॉल ड्रॉपचे प्रमाण सगळ्यात कमी आहे.

Trending