आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी स्तरावर, 69.10 रुपयांपर्यंत झाली घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य बुधवारी 68.61 रुपये होते. - सिंबॉलिक - Divya Marathi
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य बुधवारी 68.61 रुपये होते. - सिंबॉलिक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 69 रुपयांच्याही खाली तो घसरला आहे. गुरुवारी रुपयाची सुरुवात 28 पैशांनी घसरुन 68.89 वर झाली. त्यानंतर तो 69.10 पर्यंत घसरला. बुधवारी 37 पैशांनी घसरून रुपया डॉलरच्या तुलनेत 68.61 वर पोहोचला होता. तो 19 महिन्यांचा नीचांक होता. यापूर्वी 24 नोव्हेंबर 2016 ला रुपयाचे मूल्य 68.86 पर्यंत घसरले होते. क्रूड ऑइल महागल्याने तोटा आणि महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे रुपयावर वाढला दबाव. बँक आणि इंपोर्टर्सच्या वतीने डॉलरची माघणी वाढल्यानेही रुपयाचे मूल्य घसरले. 


क्रूड प्रती बैरल 77 डॉलरच्या वर 
अमेरिकेने भारतासह सर्व देशांना 4 नोव्हेंबरपर्यंत ईराणहून कच्च्या तेलाची आयात बंद करण्यास सांगितले आहे. तसे केले नाही तर प्रतिबंध लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बातमीनंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. क्रूड ऑइलचे दर 77 डॉलर प्रती बॅरलपेक्षा अधिक झाले आहेत. लीबिया आणि कॅनाडाहून पुरवठा कमी होण्याच्या शक्यतेनेही दर वाढले आहेत. परदेशी चलन व्यावसायिकांच्या मते क्रूड ऑइलच्या दरात वाढ आणि रुपयाची घसरण यामुळे भारताला दुहेरी फटका सहन करावा लागेल. 


आरबीआयच्या रिपोर्टचा परिणाम 
रिझर्व्ह बँकेने मंगळवारी फाइनांशिअल स्टेबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला. त्यानुसार बँकिंग इंडस्ट्रीची अवस्था आणखी खराबल होऊ शकते. मार्च 2018 मध्ये देशाच्या सर्व बँकांचे ग्रॉस एनपीए 11.6% होते. ते मार्च 2019 पर्यंत 12.2% वर जाऊ शकते. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, परिस्थिती आणखी खराब झाली तर एनपीए 13.3% पर्यंत पोहचू शकतो. या रिपोर्टमुळे करन्सी मार्केटमध्येही दबाव वाढला आहे. 


अमेरिका-चीनमध्ये ट्रेड वॉर
दोन्ही देशांमध्ये व्यापाराबाबत वाढणारा तणाव आणि वक्तव्यामुळे चलन व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या धोरणांमुळे अनेक देशांबरोबरच्या व्यावसायिक नात्यांवर नकारात्मक परिणाम दिसत आहे. 


शेयर बाजारात घसरण 
विक्रीच्या माऱ्यामुळे बुधवारी सेन्सेक्स 272.93 अंक आणि निफ्टी 97.75 अंकानी घसरले. शेयर बाजारातून पैसे काढल्याने आणि विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्यानेही रुपयावर परिणाम झाला. बाजारात गुरुवारीही घसरण पाहायला मिळत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...