Home | Business | Share Market | start rabbit farming with investment of rs 4 lakhs earn up to rs 70000 monthly

4.5 लाखात सुरु करा ससेपालन, 70 हजार रुपये मासिक उत्पन्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 15, 2018, 10:06 AM IST

तुम्ही शेतीशी निगडित उद्योगाचा विचार करत असाल तर असे अनेक पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही कमी गुंतवणूक करुन चा

 • start rabbit farming with investment of rs 4 lakhs earn up to rs 70000 monthly

  नवी दिल्ली- तुम्ही शेतीशी निगडित उद्योगाचा विचार करत असाल तर असे अनेक पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही कमी गुंतवणूक करुन चांगले उत्पन्न मिळवू शकता. असाच एक उद्योग ससेपालन आहे. अनेक शेतकरी ससेपालन करुन चांगले पैसे कमावत आहेत. तुम्ही 4 लाखाची गुंतवणूक करुन ससेपालन केल्यास तुम्हाला 8 लाखाचे उत्पन्न मिळू शकते.

  केवळ 10 यूनिटपासून सुरु करा उद्योग
  पॅराडाईज रॅबिट फार्मचे मालक राजेशकुमार यांनी सांगितले की, ससेपालन उद्योग यूनिटच्या आधारे करण्यात येतो. एका यूनिटमध्ये 7 माद्या आणि 3 नर असतात. सुरुवात ही 10 यूनिटपासून करावी. ही 10 यूनिट सुरु करण्यासाठी 4 ते साडेचार लाख रुपये इतका खर्च येतो. या टिन शेडसाठी 1 ते 1.5 लाख रुपये, पिंजऱ्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये, चारा आणि अन्य गोष्टीसाठी 2 लाख रुपये खर्च सामील आहे.

  6 महिन्यानंतर ब्रीडिंग सुरू
  राजेश यांनी सांगितले की, नर आणि मादी ससे जवळपास 6 महिन्यानंतर ब्रीडिंगसाठी तयार होतात. एक मादी 6 ते 7 सशाच्या पिल्लांना जन्म देते. मादी सशाचा गर्भधारणा कालावधी हा 30 दिवसांचा असतो. सुमारे 45 दिवसानंतर ही सशाची पिल्ले 2 किलोग्रॅमची होतात. ही पिल्ले विक्रीसाठी तयार असतात. एका मादी सशास 5 पिल्ले होतात. 45 दिवसात 350 पिल्ले होतात. सशांचे हे यूनिट पिल्ले होण्याच्या लायक असते. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नासाठी जास्त वाट पाहावी लागत नाही.

  वर्षाला 7 ते 8 लाखाचे उत्पन्न
  राजेश यांनी सांगितले की, 10 यूनिट सशापासून 45 दिवसात तयार झालेली पिल्ले तुम्हाला 2 लाख रुपये मिळवून देतात. ही पिल्ले तुम्ही ब्रीडिंग, मांस आणि लोकरीसाठी विकू शकता. एक मादी ससा वर्षभरात सात वेळा गर्भधारणा करते. आपण त्यांचा मृत्यूदर, आजारपण या बाबीही लक्षात घेतल्यास त्या केवळ 5 वेळा गर्भधारणा करतात असे गृहित धरल्यासही तु्म्हाला 10 लाख उत्पन्न मिळते. चाऱ्याचा खर्च 2 ते 3 लाख धरल्यास 7 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. पहिल्या वर्षी 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक लक्षात गेल्यास किमान तीन लाखाचे उत्पन्न मिळते.

Trending