आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका आयडियाने 13 वर्षात 10 लाखाचे केले 15 कोटी; नोकरी करतानाच सुचली ही कल्पना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इच्छा तिथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे याचाच प्रत्यय तेलंगणा येथील डॉ. रवींद्र रेड्डी यांना पाहिल्यावर येतो. काहीतरी तरी करुन दाखविण्याची इच्छा असणाऱ्या रेड्डी यांनी नोकरी सोडून पोल्ट्री फार्मचा बिझनेस सुरू केला. दहा लाखाचे कर्ज घेऊन त्यांनी पोल्ट्री फार्म उभारले. त्यांची आता वार्षिक उलाढाल 15 कोटी रुपये झाली आहे.

 

 

12 वर्षाचा अनुभव आला कामी
तेलंगणात राहणारे 46 वर्षीय डॉ. रवींद्र रेड्डी पॉल्ट्री सायन्समध्ये डॉक्टरेट केली आहे. त्यांना पॉल्ट्री सेक्टरमध्ये काम केल्याचा 12 वर्षांचा अनुभव आहे. पॉल्ट्री फार्म सुरू करण्यापुर्वी ते एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगारावर काम करत होते. पण या क्षेत्रात 12 वर्षाचा अनुभव असल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी सोडली. नोकरी सोडल्यावर त्यांनी अॅग्री क्लिनिक अॅण्ड अॅग्री बिझनेस सेटर स्कीममधून ट्रेनिंग घेतली आणि मग आपला बिझनेस सुरू केला. त्यांनी आपली यशोगाथा अॅग्री क्लिनिकने त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. 
 

 

पुढे वाचा: दोन लक्ष्यासोबत पोल्ट्री सेक्टरमध्ये ठेवले पाऊल