Home | Business | Share Market | these 5 Indian companies faced difficult time

या 5 कंपन्या आहेत विक्रीच्या उबरठ्यावर, कधीकाळी मार्केटमध्ये होता बोलबाला

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 20, 2018, 01:32 PM IST

भारतात कधीकाळी या कंपन्यांचा धाक होता आणि त्यांची हजारो कोटी रुपयांची उलाढाल होती. या कंपन्यांमध्ये हजारो लो

 • these 5 Indian companies faced difficult time

  नवी दिल्ली- भारतात कधीकाळी या कंपन्यांचा धाक होता आणि त्यांची हजारो कोटी रुपयांची उलाढाल होती. या कंपन्यांमध्ये हजारो लोक कामही करत होते. यात हजारो लोक गुंतवणूक करत होते. पण अचानक परिस्थिती बदलली आणि या कंपन्या विक्रीच्या मार्गावर पोहचल्या. आम्ही तुम्हाला अशाच 5 कंपन्यांविषयी सांगणार आहोत.

  #भूषण स्टील
  भूषण स्टील या कंपनीचा एकेकाळी बाजारात चांगलाच धाक होता. कर्जबाजारी झालेल्या या कंपनीची आता टाटा स्टीलला आता विक्री करण्यात येत आहे. या कंपनीवर 56 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

  एक काळ होता जेव्हा या कंपनीचे मारुती सुझूकी, टाटा मोटर्स सारखे क्लाईट होते. कंपनीला बँकाही अब्जावधीचे कर्ज देत होत्या. पण परिस्थिती अशी बदलली की कंपनी कर्जबाजारी झाली.

  कंपनीच्या प्रमोटर्सनी आपल्या या स्थितीसाठी जागतिक मंदी, खराब रेग्युलेशन आणि नशीब अशी कारणे सांगितली. भूषण स्टीलच्या एका प्रमोटरवर कर्जासाठी बँकरला लाच दिल्याचाही आरोप लागला.

  1987 मध्ये अस्तित्‍वात आली कंपनी

  भूषण स्टील ही कंपनी 1987 मध्ये अस्तित्‍वात आली. या कंपनीची स्थापना बृज भूषण सिंघल यांनी केली. ही देशात टॉप स्टील उत्पादक कंपन्यांपैकी एक होती. या कंपनीची उत्पादन केद्रे महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेशात आहेत. भूषण स्टीलला 2009 मध्ये ऑस्ट्रलियाच्या एक्सप्लोरेशन फर्मने खरेदी केले. या कंपनीचे मुख्यालय दिल्लीत आहे. या कंपनीच प्रमोटर बृज भूषण सिंघल यांना 2014 मध्ये फोर्ब्‍सने भारतातील टॉप 15 श्रीमंतांच्या यादीत ठेवले होते.

  #सत्यम कॉप्यूटर
  बी रामालिंगा राजू यांनी त्यांचे मेव्हणे डीवीएस राजू यांच्यासोबत 1987 मध्ये सत्यम कॉम्प्यूटर सर्व्हिस लिमिटेडची स्थापना केली. सत्यम ही हैदराबादमध्ये स्थापन होणारी पहिली कंपनी होती. स्थापनेनंतर सत्यम ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील देशातील चार मोठ्या कंपन्यांमधील एक बनली. तिने जवळपास 60 हजार जणांना रोजगार दिला होता. पण कालांतराने तिला घरघर लागली.

  कंपनीचे अध्यक्ष बी. रामालिंगा राजू यांनी जानेवारी 2009 मध्ये स्वत: कबूल केले की त्यांनी कंपनीच्या अकाउंटमध्ये फेरफार करुन कंपनीचा नफा वाढवून दाखवला आणि कर्ज लपवले. घोटाळा समोर येण्यापूर्वी कंपनीत 53 हजार लोक काम करत होते. फॉर्च्यून-500 श्रेणीत येणाऱ्या 185 कंपन्या सत्यमच्या क्लाइंट होत्या. कंपनीचा कामकाज 66 देशांमध्ये सुरु होते. डिसेंबर 2008 पर्यंत सत्यमचा एक शेअर 544 रुपयांना होता. घोटाळा समोर आल्यानंतर जानेवारी 2009 मध्ये त्याचे मूल्य घटून केवळ 11 रुपये प्रती शेअर राहिले. शेवटी कंपनीची विक्री करणे हा पर्याय उरला.

  पुढे वाचा: आणखी काही कंपन्यांविषयी...

 • these 5 Indian companies faced difficult time
  अनिल अंबानी यांची आरकॉम ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

  #आरकॉम
  कधीकाळी देशातील दुसरी सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आरकॉम ही आता कर्जात बुडाली आहे. या कंपनीवर 45,000 कोटी रूपयांचे कर्ज आहे. जिओची मार्केटमध्ये एन्ट्री झाल्यावर तीव्र स्पर्धेसमोर ही कंपनी टिकू शकली नाही. त्यामुळे कंपनीला 2017 च्या शेवटी कंपनीला आपला वायरलेस व्यवसाय विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता कंपनी आपला उर्वरित व्यवसायही विकण्याच्या तयारीत आहे. 

   

   

  इंडस्ट्रीत 17 टक्के होता आरकॉमचा शेअर
  2002 मध्ये मोबाईल फोन हा एक लक्झरी आयटम होता. रिलायन्स इन्फोटेकने (आताची रिलायन्स कम्युनिकेशन) अवघ्या 500 रुपयात लोकांना मोबाईल उपलब्ध करुन दिला होता. यामुळे टेलिकॉम सेक्टरमध्ये स्पर्धा वाढली. स्वस्त कॉल दर आणि आकर्षक ऑफरद्वारे त्यांनी इंडस्ट्रीत नवे बिझनेस मॉडेल मांडले. 

   

  आर-कॉमचा मार्केट शेअर टेलिकॉम इंडस्ट्रीत 2010 पर्यंत 17 टक्के होता. कंपनीच्या ग्राहकांची संख्याही चांगली होती.  

   

  #बिनानी सिमेंट
  एकेकाळी बिनानी सिमेंट देशातील अग्रणी सिमेंट कंपनी होती. परिस्थिती अशी बदलली की सेल्स घटला आणि कंपनीला कर्ज परत करणेही अवघड होऊ लागले. सध्या या कंपनीवर बँकांचे 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. सध्या कंपनी विक्रीच्या प्रक्रियेतुन जात आहे. 

  देशाशिवाय विदेशातही विस्तार
  बिनानी सिमेंटने भारतीय बांधकाम क्षेत्रात आपली खास ओळख बनवली आहे. त्यांची पॅरंट कंपनी बिनानी इंडस्ट्रीज आहे. भारताव्यतिरिक्त बिनानी सिमेंटने आंतरराष्ट्रीय बाजारातही विस्तार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनची शेडोंग बिनानी रॉगान सिंमेट कंपनी लिमिटेड (SBRCCL) आणि दुबई-बिनानी सिमेंट फॅक्टरी एलएलसीने एक खास ओळख निर्माण केली आहे. या ब्रॅन्डचे सेल्स नेटवर्क यूएई, युके, दक्षिण आफ्रिका आणि नामेबियात आहे.

   

   

  पुढे वाचा: आणखी काही कंपन्यांविषयी...

   

 • these 5 Indian companies faced difficult time

  #एयरसेल
  स्वस्त कॉल दरांमुळे एअरसेल ही भारतातील एक लोकप्रिय टेलिकॉम कंपनी ठरली होती. आता ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कंपनीने दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी अर्ज केलेला आहे. दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर एअरसेलचे कंपनी म्हणून अस्तित्व नष्ट होईल. कंपनीने 15,500 कोटी रुपयांचे कर्ज रिस्ट्रक्चर करण्याचा प्रयत्नही केला होता.

   

  1999 मध्ये भारतीय बाजारात एन्ट्री
  एअरसेलने सगळ्या पहिल्यांदा 1999 मध्ये तामिळनाडूत एन्ट्री केली होती. मलेशियाची टेलिकॉम कंपनी मॅक्सिस कम्युनिकेशनने 2005 मध्ये 74 टक्के शेअर खरेदी करुन एअरसेलचा विस्तार सुरु केला. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, युपी, बिहार, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कंपनीने आपला दबदबा निर्माण केला होता.  स्वस्त कॉलिंग, फ्री मॅसेजमुळे त्यांची सेवा लोकप्रिय ठरली होती.
   

Trending