Home | Business | Share Market | this man established over rs 3300 cr company after lost his job

52 हजार रुपयांनी केली सुरुवात, 10 वर्षात उभी केली 3300 कोटीची कंपनी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2018, 04:11 PM IST

अनेकदा नोकरी गेल्यावर काय करायचे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. पण एका 35 वर्षीय व्यक्तीने 2008 मध्ये मंदी

 • this man established over rs 3300 cr company after lost his job

  नवी दिल्ली- अनेकदा नोकरी गेल्यावर काय करायचे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. पण एका 35 वर्षीय व्यक्तीने 2008 मध्ये मंदीच्या काळात नोकरी गमावल्यावरही हार न मानता इतरांसमोर एक उदाहरण उभे केलए आहे. त्याने त्याच्याजवळ असणाऱ्या 800 डॉलर (52 हजार रुपये) एवढ्या रकमेतुन कंपनी सुरु केली. आता दहा वर्षानंतर त्याच्या कंपनीची व्हॅल्यू 3300 कोटी रुपयांची झाली आहे. चला जाणून घेऊ यात या व्यक्तीची यशोगाथा...

  नर्डवॉलेटची केली उभारणी
  अमेरिकेतील 35 वर्षीय टिम चेन यांची 2008 मध्ये मंदीच्या काळात नोकरी गेली. ते बेरोजगार झाले. चार वर्ष विविध हेज फंड हाउसमध्ये काम केल्यानंतर चेन यांना क्रिसमसच्या दिवशी समजले की त्यांची नोकरी गेली आहे. स्टैनफोर्ड येथून पदवीधारक असलेल्या चेन यांना यामुळे मोठाच धक्का बसला. त्यांना जीवन काहीतरी करुन दाखवायचे होते. चेन हे आता याला एक चांगली घटना म्हणतात. त्यांच्या मते असे झाले नसते तर ते एक चांगले उद्योजक झाले नसते. 2010 त्यांनी पर्सनल फायनान्स वेबसाईट नर्डवॉलेट सुरु केली. आज या संकेतस्थळास रोज एक कोटीहून अधिक लोक भेट देतात.

  पुढे वाचा: कशी भेटली बिझनेसची आयडिया...

 • this man established over rs 3300 cr company after lost his job

  बहिणीच्या कामातून भेटली आयडिया


  सीएनबीसीच्या अहवालानुसार, चेन यांना नर्डवॉलेट सुरू करण्याची आयडिया त्यांच्या बहिणीच्या एका कामातून मिळाली. त्यांची बहिण ऑस्ट्रेलियात राहत होती. त्यांच्या बहिणीने चेन यांना मेल करुन एका क्रेडिट कार्डाविषयी माहिती घेण्यास सांगितले. ज्याची फॉरेन ट्रान्झॅक्शन फी सगळ्यात कमी असेल. गूगलवर शोधल्यानंतरही त्यांना याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांना आपल्या अनुभवाच्या आधारे माहिती गोळा करुन ती बहिणीला दिली. 
   

  पुढे वाचा: पहिल्या वर्षी मिळाला अत्यल्प फायदा...

 • this man established over rs 3300 cr company after lost his job

  पहिल्यावर्षी झाला अत्यल्प फायदा
  वेबसाईट लॉन्च केल्यानंतर 9 महिन्यानंतर पैसे वाचविण्यासाठी त्यांना गर्लफ्रेंन्डच्या घरी शिफ्ट व्हावे लागले. 16 ते 20 तास काम केल्यानंतरही त्यांना पहिल्या वर्षी केवळ 5 हजार रुपये (75 डॉलर) मिळाले. पण दुसऱ्या वर्षी कंपनीचा रेवेन्यू 40 लाख रुपयांवर (60,000 डॉलर) पोहचला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हळूहळू वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या वाढू लागली. 2015 मध्ये नर्डवॉलेटने 703 कोटी रुपयांचा (10.5 करोड़ डॉलर) फंड गोळा केला.

   

  अशी होते कमाई
  कंपनीचा महसूल हा आर्थिक सेवांच्या माध्यमातून जमा होतो. ग्राहकांनी क्रेडिट कार्ड किंवा अन्य कोणते प्रॉडक्ट नर्डवॉलेटच्या साईटवर क्लिक करुन साईन अप केल्यास नर्डवॉलेटला पैसे मिळतात. 52 हजार रुपयांच्या गुंतवणूकीने सुरु झालेली ही कंपनी आता 3300 कोटी रुपयांच्या व्हॅल्यूची झाली आहे.   

Trending