Home | Business | Share Market | this scheme of lic gave 20 percent returns doubled in 4 years

LIC च्या या योजनेने दिला 20 टक्के रिटर्न, 4 वर्षात पैसा दुप्पट

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 08, 2018, 12:06 AM IST

LIC विम्या व्यतिरिक्त एक सहकंपनी सुध्या चालवते. LIC म्‍युचुअल फंड असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या अनेक

 • this scheme of lic gave 20 percent returns doubled in 4 years
  कर बचतीसोबतच या योजनेत तुम्हाला इक्विटीत गुंतवणूकीची संधीही मिळते.

  नवी दिल्ली- LIC विम्या व्यतिरिक्त एक सहकंपनी सुध्या चालवते. LIC म्‍युचुअल फंड असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या अनेक योजनांनी चांगला परतावा देखील दिला आहे. एप्रिल महिन्यात अनेक जण कर वाचविण्यासाठी गुंतवणूकीचे नियोजन करत असतात. अशा व्यक्तींसाठी LIC म्‍युचुअल फंडाची टॅक्स सेव्हिंग स्कीम खूपच चांगली आहे. या योजनेने एका वर्षात 19.6 टक्के रिटर्न दिला आहे. या योजनेने 5 वर्षात सरासरी 18 टक्के रिटर्न दिला आहे. अशात जर कुणी 4 वर्षापुर्वी गुंतवणूक केली असेल तर ती आता दुप्पट झाली आहे.

  जाणून घ्या डायरेक्ट आणि रेग्यूलर प्लॅनचा परतावा
  LIC म्‍युचुअल फंडाची इन्कम टॅक्‍स वाचविणारी योजना LIC टॅक्‍स प्‍लॅन आहे. यात तुम्ही डायरेक्ट प्लॅन म्हणूनही गुंतवणूक करु शकता. याशिवाय रेग्यूलर प्लॅनमध्येही गुंतवणूक करु शकता. डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एजंटचे कमिशन द्यावे लागत नाही. त्यामुळे त्यातील तुमचा परतावा वाढतो. दोन्ही योजनांमधील रिटर्न पाहून तुम्ही हे समजू शकता. डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यास जवळपास एक टक्के जास्त रिटर्न मिळतो. हे एक टक्के अंतरच दीर्घकाळासाठी संपत्तीची निर्मिती करण्यात महत्वपुर्ण ठरते. चॉईस ब्रोकिंगचे अध्यक्ष अजय केजरीवाल यांच्या अनुसार डायरेक्ट प्लॅन त्या गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे. ज्यांना म्युचुअल फंडाची चांगली माहिती आहे. जर तुम्हाला म्युचुअल फंडाची चांगली माहिती नसेल तर गुंतवणूकदाराने आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी.

  LIC टॅक्‍स प्‍लॅन स्‍कीमचा परतावा

  टॅक्‍स प्‍लॅनवाली स्‍कीम

  1 वर्ष

  2 वर्ष

  3 वर्ष

  5 वर्ष

  LIC टॅक्‍स प्‍लॅन Direct (G)

  19.6 टक्के

  22.5 टक्के

  10.9 टक्के

  18.7 टक्के

  LIC टॅक्‍स प्‍लॅन (G)

  18.1 टक्के

  21.1 टक्के

  9.8 टक्के

  17.6 टक्के

  नोट : डाटा 4 मे 2018 पर्यंतचा आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळाचा रिटर्न CAGR, म्हणजेच दरवर्षी मिळालेला रिटर्न.

  एका नजरेत स्कीम
  या योजनेची सुरुवात एक जानेवारी 1997 ला झाली होती. ही एक ओपन एन्डेड स्कीम आहे. ज्यात कधीही गुंतवणूक करता येते. यात ग्रोथ आणि डिव्हिडंड प्लॅन घेता येतो. 31 मार्च 2018 रोजी योजनेचा आकार 147.63 कोटी रुपये इतका होता. गुंतवणूकदार यात कमीत कमी 500 रुपये गुंतवू शकतात.

  स्कीममधील टॉप 5 गुंतवणूकदार
  या योजनेच्या टॉप 5 गुंतवणूकदारांपैकी दोन बँकिंग सेक्टरमधील आहेत. या योजनेच्या AMU चा 5.09 टक्के हिस्सा HDFC Bank मध्ये गुंतविण्यात आलेला आहे. त्यानंतर ICICI Bank मध्ये 4.75 पैसा लावण्यात आला आहे. Maruti Suzuki त 4.03 टक्के गुंतवणूक करण्यात आलेली आहे. TCS मध्ये 3.87 टक्के आणि Ashok Leyland मध्ये 3.43 टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे.

  मिळतो डबल फायदा
  आर्थिक सल्लागार आणि बीपीएन फिनकॅपचे डायरेक्टर ए. के. निगम यांच्या मते LIC टॅक्‍स प्‍लॅनमध्ये गुंतवणूक केल्याचा डबल फायदा आहे. एक तर ही योजना कर बचतीचा फायदा देते. त्याचबरोबर ती इक्विटीत गुंतवणूकीचीही संधी देते. या फंडात जास्तीत जास्त गुंतवणूकी ही इक्विटीत करण्यात येते. तुमचा पैसा येथे केवळ तीन वर्षे लॉकइन राहतो. त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता. देशात इन्कम टॅक्स वाचविण्याचे जे काही विकल्प आहेत त्यात टॅक्स सेविंग म्युचुअल फंडाचा लॉकइन पीरियड सगळ्यात कमी आहे. बाकी ठिकाणी 5 ते 15 वर्षांचा लॉकइन पिरियड असतो.

  पुढे वाचा: गुंतवणूकीची कोणती पध्दत चांगली...

 • this scheme of lic gave 20 percent returns doubled in 4 years
  ही योजना सातत्याने चांगला परतावा देत आहे.

Trending