Home | Business | Share Market | this woman earns in lakhs after not get job

नोकरी न मिळाल्याने या महिलेने सुरु केला हा Business, आता कमवत आहे महिना 1.60 लाख

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 14, 2018, 01:12 PM IST

अनेकदा महिला आपले घर आणि कुटूंब याचा विचार करताना आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करतात. पण हरियाणातील जिंद येथे रा

 • this woman earns in lakhs after not get job

  नवी दिल्ली- अनेकदा महिला आपले घर आणि कुटूंब याचा विचार करताना आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करतात. पण हरियाणातील जिंद येथे राहणाऱ्या सुनिला जाखड या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांनी शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला. नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि आता त्या यशस्वीपणे स्वत:चा व्यवसाय चालवत आहेत.

  नोकरी न मिळाल्याने केला 2 महिन्याचा अभ्यासक्रम
  सुनिला जाखड यांनी Divyamarathi.com ला सांगितले की, बीएसस्सी (अॅग्रीकल्चर) केल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी अर्ज केले पण त्यांना नोकरी मिळाली नाही. नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुनिला यांनी करनाल येथील इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रीबिझनेस प्रोफेशनल्सचे (ISAP) अॅग्री क्लिनिक आणि अॅग्री बिझनेस सेंटर जॉईंन केले. कोर्स पुर्ण झाल्यावर त्यांनी बिझनेस सुरु केला. आज सुनिला यांच्या बिझनेसचा वार्षिक टर्नओव्हर 60 लाख रुपये आहे.

  पुढे वाचा: काय बिझनेस करते सुनिला...

 • this woman earns in lakhs after not get job

  मधमाशी पालनाचा व्यवसाय


  2 महिन्याच्या ट्रेनिंग दरम्यान सुनिलाने एपीएरीचा (मधमाशी पालनाचे ठिकाण) दौरा केला. त्यांनी येथे आल्यावर हा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. एका बिझनेस करणाऱ्या कुटूंबात राहिल्याने त्यांना बरीच माहिती मिळाली.  हा एक चांगला व्यवसाय आल्याचे त्यांचे लक्षात आले.

   

  2 लाखाच्या गुंतवणूकीने सुरु केला बिझनेस


  सुनिला म्हणाल्या की, त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाखाची गुंतवणूक केली. त्यांनी हरियाणा हॉटिकल्चर विभागाकडून 50 पेट्या सब्सिडीने खरेदी केल्या. त्यांनी मधमाशा सुरु केल्या आणि मग तेजस एपीएरीची सुरुवात केली. तेजस एपीपरी मधमाशी पालन, बॉक्स बनवणे, मध प्रक्रिया आणि ट्रेनिंग सेंटर या सुविधा देते.

   

   

  पुढे वाचा: कशी होते कमाई 

   

   

 • this woman earns in lakhs after not get job

  असे मिळते उत्पन्न


  सुनिला यांच्या म्हणण्यानुसार, मध, बीकिपिंग बॉक्स, हनी प्रोसेसिंग अॅण्ड ट्रेनिंगने त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 60 लाख रुपये झाला आहे. त्यांनी 400 हून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे आणि 20 शेतकऱ्यांच्या समुहाला नोंदणीकृत केले आहे. ग्रामीण भागात आम्ही शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग देत आहोत. मध बनविल्यानंतर आम्ही ते खरेदी करतो. मध बनविल्यानंतर आम्ही ते खरेदी करतो आणि बाजारात ब्रॅन्डच्या नावाने विक्री करतो.

   

   

  मासिक कमाई लाखात


  त्यांनी सांगितले की, या व्यवसायातून त्या वार्षिक 20 लाख रुपये कमावतात. त्या आपल्या ब्रॅण्ड परदेशात जाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी यासाठी काही कंपन्यांसोबत करार केला आहे. 

   

Trending