Home | Business | Share Market | three risky investment options in the world

या आहेत जगातिल 3 रिस्की इन्व्हेस्टमेंट, एका झटक्यात होतात अब्जाधीश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2017, 05:37 PM IST

नवी दिल्ली- जगातिल पहिली क्रिप्टोकरन्सी बिटक्वॉईन गेल्या आठवड्यात सुमारे २०० टक्क्यांनी वाढली आहे.

 • three risky investment options in the world

  नवी दिल्ली- जगातिल पहिली क्रिप्टोकरन्सी बिटक्वॉईन गेल्या आठवड्यात सुमारे २०० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू २० हजार प्रति डॉलर युनीटवर गेली आहे. जबरदस्त रिटर्न मिळत असल्याने बिटक्वॉईनने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे. गुंतवणूकदार लाखो रुपये बिटक्वाईनवर लावत आहेत.

  मीडियात आलेल्या वृत्तानुसार, ७ वर्षांपूर्वी तुम्ही जर १५ रुपये यात लावले असते तर आता तुम्हाला १.५ कोटी रुपये मिळाले असते. असे असतानाही क्रिप्टोकरन्सी लोकांसाठी एक कोडे झाले आहे. कोणत्याही सरकारची मान्यता नसल्याने जगभरातील गुंतवणुकदारांसाठी ती एक रिस्की इन्व्हेंटमेंट झाली आहे. पण अशी ही एकमेव इन्व्हेस्टमेंट नाही. आज आम्ही तुम्हाला अशा तीन आणखी रिस्की इन्व्हेस्टमेंटची माहिती देणार आहोत.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर रिस्की इन्व्हेस्टमेंटबद्दल....

 • three risky investment options in the world

  बिटक्वॉईन
  याला जगातिल सर्वात धोकादायक गुंतवणूक समजले जाते. लोकांनी जेवढे कमविले असतील तसेच गमविलेही असतील. गेल्या महिन्यात ही करन्सी टेक्नॉलॉजीने अपग्रेड करण्यात आली. तेव्हा काही युजर यातून बाहेर पडले. तेव्हा बिटक्वॉईनमध्ये मोठी घट दिसून आली. त्यामुळे ५ लाख रुपये प्रति युनिट असलेली करन्सी ३.६ लाखांवर आली होती. तेव्हा ज्याच्याकडे १ कोटीचा पोर्टफोलियो होता तो चक्क ७५ लाखांवर आला होता.

 • three risky investment options in the world

  व्हेंचर कॅपिटल
  ही जगातिक आणखी एक रिस्की गुंतवणूक आहे. व्हेंचरकॅपिटलिस्ट ज्यास्त करुन स्टार्टअपवर पैसे लावतात. कोणतेही स्टार्टअप यशस्वी होण्यासह फेल होण्याची शक्यता जास्त असते. या प्रकरणात गुंतवणुकीत तोटा होण्याची ८० टक्के शक्यता असते. पण जेव्हा नफा होतो तेव्हा छप्पर फाडके होतो.

 • three risky investment options in the world

  इनिशिअल पब्लिक ऑफरिंग
  जगभरातिल लोकांमध्ये इन्व्हेस्टमेंटचा ही प्रचलित पद्धत आहे. दरम्यान ही खुप रिस्की समजली जाते. भारतात नुकताच सुपमार्केटचा आयपीओ आला होता. त्यातून लोकांनी २७६ टक्के रिटर्न कमविला होता. पण बऱ्याच वेळा मोठे नुकसानही होते.

Trending