Home | Business | Share Market | walmart may launch ipo for flipkart in 4 years

4 वर्षात येऊ शकतो फ्लिपकार्टचा IPO, वॉलमार्टने सांगितली टाइमलाइन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 12, 2018, 02:21 PM IST

भारतातील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी चार वर्षाच्या आत स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेट होऊ शकते. वॉलमार्ट इंकने शनिवारी

 • walmart may launch ipo for flipkart in 4 years

  मुंबई- भारतातील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी चार वर्षाच्या आत स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेट होऊ शकते. वॉलमार्ट इंकने शनिवारी अमेरिकी रेग्युलेटरमध्ये करण्यात आलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे की चार वर्षाच्या आत फ्लिपकार्टचा आयपीओ येऊ शकतो. वॉलमार्टने नुकतेच फ्लिककार्टला खरेदी केले आहे. असे पहिल्यांदाच होत आहे की फ्लिपकार्टच्या संभावित यादीत टाईमलाईम सादर करण्यात आली आहे.

  गुंतवणुकीपेक्षा कमी नाही होणार IPO चे व्हॅल्यूएशन
  जगातील सगळ्यात मोठ्या रिटेलर असणाऱ्या वॉलमार्टने यूएस सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशनमध्ये फाईल करण्यात आलेल्या माहितीनुसार वॉलमार्टने म्हटले आहे की वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टची डील पूर्ण झाल्याने चार वर्षाच्या आत फ्लिपकार्टचा आयपीओ आणण्याची गरज पडू शकते. गुंतवणूकीपेक्षा कमी व्हॅल्यूएशनचा आयपीओ आणण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

  वॉलमार्टने 77 टक्के हिस्सेदारी खरेदी केल्याची केली घोषणा
  वॉलमार्टने या आठवड्याच्या सुरुवातीला घोषणा केली होती की फ्लिपकार्टच्या 77 टक्के हिस्सेदारीसाठी 16 अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहेत. वॉलमार्टला आतापर्यंतच्या या सगळ्यात मोठ्या डीलमुळे भारतात अमेझॉनला टक्कर देण्यास मदत होणार आहे. या गुंतवणूकीनंतर बंगळुरु येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीचे व्हॅल्यूएशन 21 अब्ज डॉलर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 • walmart may launch ipo for flipkart in 4 years
  वॉलमार्टने यूएस रेग्युलेटर्सला टाईमलाईन दिली आहे.

Trending