Home | Business | Share Market | who is ds kulkarni and how he become millionaire

4000 गुंतवणूकदारांना धोका देणाऱ्या DSK बाबत नेमके काय घडले, कसा झाला प्रवास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 23, 2018, 05:26 PM IST

DSK म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी हे नाव माहिती नाही असा मराठी माणूस कदाचित एकही नसेल. पुणे पोलिसांच्या आर्थि

 • who is ds kulkarni and how he become millionaire

  नवी दिल्ली- DSK म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी हे नाव माहिती नाही असा मराठी माणूस कदाचित एकही नसेल. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ इंडियाच्या (BoM) सीईओ आणि एमडी रविंद्र मराठे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर डीएसकेंबाबतच्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

  डीएसकेंचा प्रवास
  डीएसके म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी यांनी 1970 मध्ये एक छोट्या फर्मची टेली स्मेलची स्थापना केली. कंपनी टेलिफोन रिसिव्हरच्या स्वच्छतेचे आणि परफ्यूमिंगचे काम करत होती. पण डीएसकेंची नजर बांधकाम व्यावसायाकडे पहिल्यापासूनच होती. एक दिवस ते टेलिफोन स्वच्छतेसाठी एस. एल. किर्लोस्कर यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी एस. एल. किर्लोस्कर, चेअरमन अॅण्ड मॅनेजिंग डायरेक्टर अशी पाटी पाहिली. ही पाटी पाहिल्यावर डीएसकेंच्या मनात भावना आली की आपलीही अशी कंपनी असावी आणि आपलेही नाव अशाच पध्दतीने लिहिलेले असावे. त्यांचे हे स्वप्न साकार झाले 1970 साली डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सची सुरुवात झाली. 1991 मध्ये बांधकाम व्यवसायात काळ्या पैशांचा बराच बोलबाला होता. कोणताही बिल्डर पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करत नव्हता. अशा काळात डीएसकेंनी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर कंपनी लिमिटेड बनवली. ही कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेट करण्यात आली.

  124 प्रॉपर्टी अटॅच करण्याचे नोटिफिकेशन
  बँक ऑफ महाराष्ट्रच्या दोन अधिकाऱ्यांशिवाय ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये डीएसके ग्रुपचे सीए सुनील घाटपांडे, इंजिनिअरिंग विभागाचे उपाध्यक्ष राजीव नेवासककर आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांचा समावेश आहे. मागील महिन्यात कुलकर्णी, त्यांची पत्नी आणि डीएसके ग्रुपच्या अधिकाऱ्यांशी निगडित 124 मालमत्ता, 276 बँक अकाउंट आणि 46 वाहनांना अटॅच करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले.

Trending