Home | Business | Share Market | with cow dung he has built a rs 5 crore turnover business

शेणापासून ही व्यक्ती बनवते साबण-तेल, दरवर्षी करते 5 कोटीचा व्यवसाय

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 25, 2018, 02:08 PM IST

गाईचे तुप, दुध आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगण्यात येत. शेणापासून बायोगॅस निर्मितीबद्दलही तुम्ही ऐकले असेल

 • with cow dung he has built a rs 5 crore turnover business
  काऊपॅथीचे संस्थापक उमेश सोनी.

  नवी दिल्ली- गाईचे तुप, दुध आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगण्यात येत. शेणापासून बायोगॅस निर्मितीबद्दलही तुम्ही ऐकले असेल. पण तुम्ही कधी ऐकले आहे की शेण आणि गोमूत्रापासून बनविलेल्या साबणापासून स्नानही करता येते. आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल माहिती देत आहोत ज्याने शेणाचा वापर करुन कोट्यावधी रुपये कमावले आहेत. मुंबईत असलेली त्यांची कंपनी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून साबण, टूथपेस्ट, क्रीम, फेस वॉश आणि अन्य कॉस्मॅटिक प्रोडक्ट बनवते.

  गाईच्या शेण-गोमूत्रापासून बनवतात प्रोडक्ट
  काऊपॅथीचे फाउंडर उमेश सोनी यांनी दिव्य मराठीला सांगितले की, शेणात आणि गोमूत्रात आजाराशी लढण्याचे अनेक गुण आहेत. आयुर्वेदात पंचगाव्य म्हणजे गोमूत्र, गायीचे शेण, दूध, दही आणि तूप याद्वारे आजारांवर उपायांचा उल्लेख आहे. या सगळ्याच विचार करुन त्यांनी शेण आणि गोमूत्रापासून साबण बनविण्यास सुरुवात केली. हळूहळू लोकांना कळल्यावर या वस्तूंना मागणी वाढली. त्यामुळे बिझनेसही वाढला.

  पुढे वाचा: किती लागले भांडवल

 • with cow dung he has built a rs 5 crore turnover business

  10 लाख रुपयांपासून सुरुवात

   

  - सोनी यांनी सांगितले की, वर्ष 2012 मध्ये लाख रुपयांची गुंतवणूक करुन त्यांनी ही कंपनी सुरु केली. ही रक्कम त्यांना एक्सपोर्टच्या बिझनेसमधुन मिळालेल्या फायद्याची होती. काऊपॅथी सुरु करण्यापूर्वी त्यांनी एका मित्रासोबत एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला होता. याअंतर्गत ते कॉस्मेटिक प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करत होते. 

   

  शेणापासून साबण बनविण्याची ही आहे प्रक्रिया
  गायीच्या शेणापासून प्रोडक्ट बनविण्यासाठी ते अतिशय उष्ण तापमानात शेण वाळवतात. शेणाचा वास दूर करण्यासाठी त्यात सुगंधी तेल टाकण्यात येते. अशाच रितीने गोमूत्र उकळून त्याचा वापर वेगवेगळ्या वस्तूंमध्ये करण्यात येतो.

   

  पुढे वाचा: किती देशांमध्ये होतो एक्सपोर्ट

 • with cow dung he has built a rs 5 crore turnover business

  13 देशांमध्ये एक्सपोर्ट


  - गायीच्या शेणापासून बनविण्यात येणाऱ्या साबणाचे सोनी यांनी पेटंट घेतले आहे. त्यांनी एकूण चार पेटंट घेतले आहेत. काऊपॅथीच्या या साबणाची किंमत 35 रुपये आहे. हा साबण भारतासह 13 देशात एक्सपोर्ट करण्यात येतो. यात यूक्रेन, रशिया, अमेरिका आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे.

Trending