Home | Business | Share Market | you can also take lessons from simple inventions that made normal people rich

एका आयडियाने कमावले कोट्यावधी रुपये, तुमच्याकडे असेल idea तर तुम्हीही व्हाल करोडपती

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 27, 2018, 04:05 PM IST

एक साधी आयडिया व्यवसायात रुपांतरित करुन तुम्ही कोट्यावधी रुपये कमावू शकता. तुम्ही अशा कितीतरी गोष्टींकडे दुर

 • you can also take lessons from simple inventions that made normal people rich

  नवी दिल्ली- एक साधी आयडिया व्यवसायात रुपांतरित करुन तुम्ही कोट्यावधी रुपये कमावू शकता. तुम्ही अशा कितीतरी गोष्टींकडे दुर्लक्ष करता ज्याद्वारे तुम्ही कोट्यावधी रुपये कमावू शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही सिंपल आयडिया सांगणार आहोत ज्यामुळे काही जण कोट्याधीश झाले. त्यांनी आसपास असणाऱ्या बाबी गांभीर्याने घेतल्याने ते असे करु शकले.

  पुढे वाचा...

 • you can also take lessons from simple inventions that made normal people rich

  स्नगीज


  अनेकचा चांगल्या वस्तूही खपत नाहीत याला कारण त्याचे विपणन नीट केलेले नसते. चांगल्या विपणनामुळे साधी कनसेप्टही यशस्वी होऊ शकते.

  सन्गीज एक कांबळी किंवा घोंगडी आहे. ज्यात दोन बाहू असतात. याची खासियत ही आहे की तुम्ही हे ब्लॅन्केट गळ्यापर्यंत ओढून घेऊ शकता. तुमचे हात उघडे असल्याने तुम्ही पुस्तक वाचणे, फोन किंवा लॅपटॉपवर सहज काम करु शकता. या कन्स्पेटला सुरुवातीला हास्यास्पद ठरविण्यात आले होते कारण यापूर्वी स्लेंकेट आणि फ्रीडम ब्लॅन्केट हे प्रोडक्ट यशस्वी ठरले नव्हते. ऑल स्टॉर मार्केटिंगचे सीईओ स्टॉक बॉयलेन यांना या वस्तूचे महत्व समजले. त्यांनी लोकांचा या वस्तूकडे पाहण्याचा हास्यास्पद दृष्टीकोन या वस्तूच्या जाहिरातीत समाविष्ट केला आणि हे प्रोडक्ट लोक वापरू लागले. ते यशस्वी झाले. आतापर्यंत 20 कोटी डॉलरचे म्हणजेच 1,300 कोटी रुपयांचे स्नगीजची विक्री झाली आहे. स्नगीजच्या यशाचा फायदा अन्य दोन्ही ब्रॅन्ड स्लेंकेट आणि फ्रीमड ब्लॅंकेटलाही झाला आहे. 
   

 • you can also take lessons from simple inventions that made normal people rich

  स्मायली 


  'द रिचेस्ट' अनुसार आयडिया यशस्वी होण्याच्या अनेक शक्यता असतात. यात फील गुड फॅक्टर अतिशय महत्वाचा असतो. याचे सगळ्यात मोठे उदाहरण स्मायली फेस आहे. हे तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. हार्वे बालने आपली पीआर कंपनीचे क्लाइंट स्टेट इन्शूरन्ससाठी स्मायली फेस बनवले. त्यासाठी त्यांना केवळ 45 डॉलर मिळाले. त्यांनी हे फेस पेटंट करण्याचा विचारही केला नाही. तर बर्नाड आणि मरे या भावांची नजर यावर पडल्यावर त्यांना याचे महत्व लक्षात आले. त्यांनी या स्मायली फेसचे हक्क विकत घेतले आणि हॅव अ नाईस डेच्या लाईन सोबत ते मार्केटमध्ये उतरवले. 

   

  उभी राहिली कोट्यावधीची कंपनी
  त्यांनी टी शर्ट, कार्ड, कपडे, कप अशा वस्तूंवर हे चित्र छापले आणि या वस्तू बाजारात आणल्या. लोकांवर 18 महिने याचा प्रभाव होता. 1971 पर्यंत या दोघा भावांनी याद्वारे 5 कोटी डॉलर कमावले. त्यांनी त्यानंतर एका रिटेल चैनद्वारे याची विक्री सुरु ठेवली. नंतर या भावांनी ही रिटेल चैन 50 कोटी डॉलरला विकली. आजच्या हिशोबाने ही किंमत 3 हजार कोटी रुपयांहून अधिक होते.  

   

Trending