आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या या 3 योजनांमुळे कमाईची संधी, एका वर्षात 42% वाढेल पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकारने मागील 4 वर्षात देशात अनेक नव्या योजना आल्या. या परवडणारी घरे, स्मार्ट सिटी योजना, डिजिटल इंडिया. जनधन, बॅंकरप्सी कोड, मेक इन इंडिया आणि स्कील इंडिया या योजनांचा समावेश आहे. या योजनांचा फायदा सर्वसामान्यांना झाल्याचा सरकारचा दावा आहे. मोदींच्या या योजनेचा फायदा काही कंपन्यांनाही झाला आहे. या योजनांमुळे या कंपन्यांच्या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळाली आहे. काही कंपन्या अशाही आहेत ज्यात एका वर्षात 42 टक्के ग्रोथ पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करुन तुम्ही चांगली कमाई करु शकता.

 

 

1. टीमलीज
टीमलीज एचआर कन्स्लटन्सी ही कंपनी कुशल कामगार पुरवते. सरकारच्या स्कील इंडिया योजनेमुळे कंपनी चांगली कामगिरी करु शकते.  कंपनीची 8 विभागीय कार्यालये आहेत. कंपनीत 1000 कर्मचारी कार्यरत असुन कंपनी जवळपास 2500 कॉर्पोरेट क्लाइंटसोबत कार्यरत आहे.

 

 

किती मिळेल परतावा
ब्रोकर हाऊस एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, कंपनीचा शेअर पुढील काही महिन्यात 3300 रुपयांच्या भावावर पोहचू शकतो. सध्या एका शेअरचा भाव 2821 रुपये आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदार एका वर्षात जवळपास 17 टक्के परतावा मिळवू शकतात. म्हणजेच तुम्ही एक लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला काही महिन्यातच 1.17 लाख रुपये मिळू शकता.

 

 

2. इंडियाबुल्स हाउसिंग
मोदी सरकारच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेचा फायदा इंडियाबुल्सला मिळाला आहे. इंडियाबुल्स ही देशातील दुसरी सगळ्यात मोठी हाउसिंग फायनान्स कंपनी आहे. ती लहान ग्राहकांनाही परवडणाऱ्या दरात कर्ज देते. जाणकरांचे म्हणणे आहे की अफोर्डेबल हाउसिंग स्कीमचा या कंपनीला फायदा होईल. कंपनीची अॅसेट क्वालिटीची चांगली आहे. लोन ग्रोथ मजबूत आहे.

 

 

किती मिळेल परतावा
ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओसवालच्या म्हणण्यानुसार येत्या काही महिन्यात कंपनीच्या शेअरचा भाव 1650 रुपये होऊ शकतो. आता एक शेअरची किंमत 1203 रुपये आहे. याचाच अर्थ गुंतवणुकदार एका वर्षात 37 टक्के परतावा प्राप्त करु शकतात. याचाच अर्थ तुम्ही 1 लाख रुपये गुंतविल्यास तुम्हाला काही महिन्यात 1.37 लाख रुपये मिळतील. 

 

 

 

3. स्टरलाइट टेक्नोलॉजी
स्मार्ट सिटी स्कीमअंतर्गत सरकारचे लक्ष्य 100 स्मार्ट सिटी बनविण्याचे आहे. स्मार्ट सिटी स्कीममुळे स्टरलाइट टेक्नोलॉजीची चमक वाढली आहे. ऑप्टिकल फायबर टाकण्यात येत असल्याने कंपनीला फायदा झाला आहे.  कंपनीला जयपूर, गांधीनगर, काकीनाडा या स्मार्टसिटीची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने स्मार्टसिटीसाठी वेगळा विभागच बनवला आहे. 2014 मध्ये स्टरलाइट टेक्नोलॉजीचा भाव प्रती शेअर 28 रुपये होता. याची सध्याची किंमत 300 रुपये प्रती शेअर होता. 

 

 

किती मिळेल परतावा
ब्रोकरेज हाउस आयसीआयसीआय डायरेक्टचे म्हणणे आहे की, स्टरलाइट टेक्नोलॉजीचा शेअर 440 रुपयांचा होईल. शेअरची सध्याची किंमत 303 रुपये आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा मिळू शकतो. म्हणजेच जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला काही महिन्यातच 1.42 लाख रुपये मिळु शकतात. 

 

बातम्या आणखी आहेत...