Home | Business | Share Market | your investment doubled in 2 or 3 days in this option

केवळ 2 ते 3 दिवसांत पैसे होतील दुप्पट, सगळे आहे कायदेशीर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 15, 2017, 01:02 PM IST

मुंबई- प्रत्येक गुंतवणुकदाराला वाटते, की त्याचे पैसे कमीत कमी वेळेत दुप्पट, तिप्पट व्हावेत.

 • your investment doubled in 2 or 3 days in this option

  मुंबई- प्रत्येक गुंतवणुकदाराला वाटते, की त्याचे पैसे कमीत कमी वेळेत दुप्पट, तिप्पट व्हावेत. यासाठी तो अनेक पर्यायांच्या शोधात असतो. काही लोक सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे जमा करतात, तर काही एफडीत पैसे टाकतात, काही पोस्ट ऑफिसमध्ये जातात तर काही सरकारी स्कीमला फायदा उचलतात. पण येथे तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी कमीत कमी ६ ते ७ वर्षे लागतात. पण फायनान्स मार्केट असे आहे, जेथे अल्पावधीत तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. विशेष म्हणजे हे बेकायदेशीरही नाही.

  येथे मिळवा काही तासांत दुप्पट रिटर्न
  आम्ही बोलतोय ते आयपीत गुंतवणूक करण्याची. जवळपास प्रत्येक कंपनी फंड गोळा करण्यासाठी वेळोवेळी बाजारपेठेत आयपीओ आणतात. त्याचा फायदा तुम्ही उचलू शकता. आयपीओचा फायदा असा असतो, की लिस्टिंगच्या वेळीच तुमची गुंतवणूक दुप्पट होऊ शकते. आय़पीओ दोन-तीन दिवस खुला असतो. तुम्ही सुरवातीला १ लाख गुंतवले असेल तर लिस्टिंगमध्ये वाढून २ लाखही होतात.

  येथे काही तासांत २.५ टक्के वाढ
  सालासर टेक्नो इंजिनिअरिंग- याचा स्टॉक जुलैमध्ये १४० टक्के प्रिमिअमवर लिस्ट झाला होता. स्टॉक १०८ रुपयांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत बीएसईवर २५९ या स्तरावर आला होता. म्हणजे ज्यांनी या स्टॉकवर १ लाख गुंतवले त्यांचे काही तासांत १.४० लाख रुपयांच्या नफ्यावर गेला होता.

  एव्हेन्यू सुपरमार्केट (डी-मार्ट)- यावर्षी मार्च महिन्यात आर. के. दामानी कंपनीच्या डी-मार्टने बाजारपेठेत आयपीओ आणला होता. शेअरसाठी ऑफर प्राईज २९५ ते २९९ रुपयांमध्ये ठेवली होती. पण लिस्टिंगच्या दिवशी शेअर ११५ वाढून ६४२ रुपयांवर लिस्ट झाला होता.

  CDSL- जुलै महिन्यात सीडीएसएल ६८ टक्के वाढून लिस्ट झाला. शेअर ऑफर प्राईज १४९ च्या तुलनेत २५० रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजे १ लाख रुपयांचे १.८ लाख रुपये झाले.

  AU स्मॉल फायनान्स- ५० टक्के वाढीसह शेअऱ ऑफर प्राईस ३५८ च्या तुलनेत ५२५ रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजे १ लाख रुपये लावणाऱ्यांना १.५ लाख रुपये अगदी काही तासांत मिळाले.

  पुढील स्लाईडवर वाचा, कशी करता येईल आयपीओत गुंतवणूक....

 • your investment doubled in 2 or 3 days in this option

  आयपीओत करा गुंतवणूक
  - आयपीओत तुम्ही थेट गुंतवणूक करु शकता. यासाठी तुमचे डीमॅट अकाऊंट असायला हवे. त्यासाठी ब्रोकरची मदत तुम्ही घेऊ शकता.
  - प्रत्येक ब्रोकर हाऊस वेबसाईटवर वेगवेगळ्या सुचनांचे एक सेक्शन ठेवत असते. तेथील सुचनांचे पालन करुन तुम्ही आयपीओसाठी अर्ज करु शकता.
  - यात सर्वात प्रमुख आहे, की तुम्ही कोणत्या स्टॉकसाठी कधी अप्लाय केले आहे.
  - तुमच्या अर्जानुसार तेवढी रक्कम आयपीओ बंद होण्यापासून लिस्टिंगपर्यंत ब्लॉक केली जाते.

 • your investment doubled in 2 or 3 days in this option

  या बाबींकडे ठेवा लक्ष
  चांगला आयपीओ निवडण्यासाठी कंपनीचा अभ्यास करा. सगळी माहिती मिळवा. त्यानंतर तुमचे अंडरस्टॅंडिंग तयार होईल. त्याच्या बळावर तुम्ही त्या कंपनीचा आयपीओ विकत घेऊ शकता. काही रेटिंग एजंसी त्या आयपीओला रेटिंग देत असतात. त्यावर नजर ठेवा. जेव्हा २ किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग एजंसीने पॉझिटिव्ह साईन दिली आहे तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता. कंपनीच्या चांगल्या बिझनेससह आयपीओच्या किमतीवर लक्ष ठेवा. ब्रोकरची रिपोर्ट बघा. बाजारातील प्रमोटर्स शिवाय दुसऱ्या गुंतवणुकदारांवरही लक्ष ठेवा.

 • your investment doubled in 2 or 3 days in this option

  किती रक्कम लावायला हवी
  आयपीओत तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता. यात एका शेअरसाठी बिडिंग करता येत नाही. येथे एप्लिकेशन लॉट साईजने होते. म्हणजे तुम्हाला कमीत कमी एक निश्चित संख्येने बिडिंग करावे लागते. तुम्ही किमान १० ते १५ हजार रुपये घेऊन या बिझनेसमध्ये उतरायला हवे.

 • your investment doubled in 2 or 3 days in this option

  हे आहेत फायदे
  - बिझनेस वाढविण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या वेळोवेळी आयपीओ बाजारात आणत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवा.
  - त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या कंपनीत हिस्सेदार होऊ शकता. कारण तुम्ही त्यात पैसे गुंतवले असतात.
  - गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ मिळते. या वेळेत तज्ज्ञांनी संपर्क साधा. त्यांचे मत जाणून घ्या. नंतर निर्णय घ्या.
  - आयपीओसाठी एक प्राईस बॅंड तयार केले जाते. त्यातून कट ऑफ प्राईस काढली जाते. ज्या किमतीवर इश्यू प्राईस केला जातो त्यावरच गुंतवणुकदारांना शेअर मिळतो.
  - गुंतवणुकदारांना हायर बॅंडनुसार पैसे द्यावे लागतात. इश्यू कमी प्राईसवर लिस्ट झाला तर इतर पैसा गुंतवणुकदारांना परत केला जातो.
  - आय़पीओ बंद झाल्यानंतर लिस्टिंग या दरम्यान किमान १० दिवसांची कालावधी लागतो.

Trending