Home | Business | Share Market | A 13 yrs boy earns money during odd-even formula in New Delhi

ऑड-इव्हनवर या 13 वर्षांच्या मुलाने केली लाखोंची कमाई, हा होता भन्नाट फॉर्म्युला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 13, 2017, 05:11 PM IST

नवी दिल्ली- राजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी ट्राफिकच्या ऑड-इव्हन फॉर्म्युल्यावर विचार करण्यात आला.

 • A 13 yrs boy earns money during odd-even formula in New Delhi
  नवी दिल्ली- राजधानीतील प्रदुषण कमी करण्यासाठी ट्राफिकच्या ऑड-इव्हन फॉर्म्युल्यावर विचार करण्यात आला. अखेरच्या क्षणी दिल्ली सरकारने एक पाऊल मागे घेत हा निर्णय मागे घेतला. या प्लॅननुसार ऑड डे ला ऑड क्रमांकाची वाहने आणि इव्हन डेला इव्हन क्रमांकाची वाहने रस्त्यावर धावतील. यापूर्वी दोन वेळा हा फॉर्म्युला दिल्लीत लागू करण्यात आला होता. त्यावेळी दिल्लीकरांना मोठ्या असुविधेला सामोरे जावे लागले होते. पण एका १३ वर्षांच्या मुलाने लोकांची असुविधा दूर करण्याचा मार्ग दाखविण्यासह चांगले बक्कळ पैसेही कमविले होते.
  वाचा पुढील स्लाईडवर या १३ वर्षांच्या मुलाने नेमके केले तरी काय...

 • A 13 yrs boy earns money during odd-even formula in New Delhi
  कोण आहे हा मुलगा
  अक्षत मित्तल असे या नोएडा एमिटी शाळेच्या मुलाचे नाव आहे. त्याने odd-even.com नावाची एका वेबसाईट तयार केली होती. कार पुलिंग सोपे करणे असा या वेबसाईटचा उद्देश होता. या वेबसाईटवर नोंदणी केल्यावर तुम्हाला कार पुलिंग करणे सोपे जाते. तुमच्याकडे ऑड क्रमांकाची गाडी आहे आणि आजच्या दिवस इव्हन क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावू शकतात. अशा वेळी तुम्हाला तुमचा जाण्याचा मार्ग वेबसाईटवर सांगावा लागेल. त्यानंतर त्या रस्त्यावरुन जाणारे इतर लोक तुम्हाला मदत करु शकतील. त्याचा मोबदला म्हणून दुसऱ्यादिवशी तुम्हाला त्या व्यक्तीला तुमच्या कारमध्ये लिफ्ट द्यावे लागेल.
 • A 13 yrs boy earns money during odd-even formula in New Delhi
  अशी झाली कमाई
  जानेवारी २०१६ मध्ये हा फॉर्म्युला लागू करण्यात आला तेव्हा या वेबसाईटची मोठी चर्चा झाली. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये पुन्हा हा फॉर्म्युला लागू झाला तेव्हा एका फ्युअल कंपनीने अक्षतशी संपर्क साधला होता. त्यांनी ही वेबसाईट खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर त्याने काही लाख रुपयांना ही वेबसाईट विकली, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली होती. पण नेमकी ती कितीला विकली हे समजले नव्हते. अक्षत आजही या वेबसाईटचा डायरेक्टर आहे.

Trending