Home | Business | Share Market | Aevhenyu Super Smarts Reported 10-year big listing,share 114 %

अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नोंदवली 10 वर्षांतील मोठी लिस्टिंग, शेअर 114 टक्के वाढीसह बंद

वृत्तसंस्था | Update - Mar 22, 2017, 05:33 AM IST

डी-मार्ट रिटेल स्टोअर चालवणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने आज मंगळवारी विक्रमी लिस्टिंग नोंदवली आहे. केवळ २९९ रुपयांत अॅलॉट-खुले झालेले शेअर ६०४. ४० रु. म्हणजेच १०२ .१४ टक्के वाढीसह लिस्ट झाले. यानंतर यात किंचितशी घसरण आली आणि हा शेअर ५५८. ७५ रुपयांवर आला. पण ही घसरण अर्धा तासही टिकली नाही.

 • Aevhenyu Super Smarts Reported 10-year big listing,share 114 %
  मुंबई- डी-मार्ट रिटेल स्टोअर चालवणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने आज मंगळवारी विक्रमी लिस्टिंग नोंदवली आहे. केवळ २९९ रुपयांत अॅलॉट-खुले झालेले शेअर ६०४. ४० रु. म्हणजेच १०२ .१४ टक्के वाढीसह लिस्ट झाले. यानंतर यात किंचितशी घसरण आली आणि हा शेअर ५५८. ७५ रुपयांवर आला. पण ही घसरण अर्धा तासही टिकली नाही.
  शेअर ६५० रु. म्हणजेच ११७. ३९ टक्क्यांपर्यंतच्या उंचीला स्पर्श केल्यानंतर ६४०.७५ रु.वर बंद झाला. इश्यू प्राइसच्या तुलनेत ही ३४१ .७५ रु म्हणजेच ११४.३ टक्के अधिक आहे. एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये) मध्ये याचे शेअर ६४१. ६० रु. यावर बंद झाले. बंद होताना-क्लोजिंगच्या भावावर कंपनीचे मार्केट कॅप ३९,९८८.२१ कोटी रु. झाले आहे
  प्रमोटर राधाकृष्ण दामाणी यांची नेटवर्थ राहुल बजाज आणि अनिल अंबानींहून अधिक
  इश्यूपूर्वी प्रमोटर राधाकृष्ण दामाणी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे कंपनीचे ५१२,९१०,००० म्हणजे ९१ टक्के शेअर होते. इश्यूनंतर प्रमोटर होल्डिंग ८२. २ टक्के राहिली.
  यात दामाणींची खासगी होल्डिंग ३९. ४ टक्के आणि कुटुंबीयांची ४२.८ टक्के आहे. मंगळवारी मार्केट कॅपनुसार याची किंमत ३२,८७० कोटी रुपये होती. ब्ल्यूडार्ट आणि व्हीएसटी इंडस्ट्रीज ९ कंपन्या दामाणींच्या १ टक्क्याहून अधिक होल्डिंगच्या आहेत. ६१ वर्षांचे दामाणी पहिले स्टॉक ब्रोकर होते.
  आयपीओ १०४ पट सबस्क्राइब-वर्गणीदार
  अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने ८-१० मार्चच्या दरम्यान आयपीओमधून १,८७० रुपये जमवले होते. ऑफर प्राइस २९५-२९९ रुपयांवर इश्यू १०४ पट सबस्क्राइब झाले होते. शेअर खरेदीसाठी १.३८ लाख कोटी रुपयांची ऑफर आली होती. हे २०२० मध्ये कोल इंडियानंतर सर्वाधिक आहेत. समभाग इश्यूचा रिटेल भागही ७. ५ पट झाला होता.
  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीएनबी हाउसिंग फायनान्सच्या ३,००० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर हे सर्वात मोठे आहे. गेल्या वर्षी अॅडव्हान्स्ड एंझाइमचा आयपीओ ११६ पट आणि क्वेस कॉर्पचे १४५ पट सबस्क्राइब झाले होते. पीएनबी हाउसिंग फायनान्सचा समभाग इश्यू ३० पट सबस्क्राइब झाला होता.

Trending