आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी, कंपन्यांच्या कामगिरीवर नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंपन्यांनी अपेक्षे पेक्षा केलेली निराशाजनक कामगिरी अाणि अाशियाई शेअर बाजारातील मरगळीने पुन्हा एकदा बाजाराचा मूड हिरावून घेतला. विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स ५० अंकांनी घसरून २७,४४०.१४ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्स सकाळच्या सत्रात २७,५६१.३२ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे सेन्सेक्स २७,६०३.७१ अंकांच्या अाणखी कमाल पातळीवर गेला. परंतु दुपारनंतर झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स सकाळची कमाई कायम राखू शकला नाही. ऊर्जा, ग्राहकाेपयाेगी वस्तू, वित्त अाणि वाहन क्षेत्रातील समभागांना विक्रीचा फटका बसला. दिवसअखेर सेन्सेक्स ५०.४५ अंकांनी घसरून २७,४४०.१४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या सत्रात वस्तू अाणि सेवा कर विधेयकाला मंजुरी मिळण्याची अाशा बाजारात िनर्माण झाली. त्यामुळे पुन्हा अखेरच्या सत्रात खरेदी सुरू झाली त्यामुळे माेठ्या घसरणीला लगाम बसला.

वित्त विधेयकाला मिळालेली मंजुरी अाणि ‘मॅट’ कराबाबत सरकारकडून स्पष्टता मिळाल्यामुळे बुधवारी सेन्सेक्सने ४७९.२८ अंकांची कमाई केली हाेती. निफ्टीचा निर्देशांक ७.१५ अंकांनी घसरून ८,३२४.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

हे समभाग अापटले
महिंद्र अॅंड महिंद्र, एचडीएफसी, स्टेट बँक अाॅफ इंडिया,सिप्ला, बजाज अाॅटाे, इन्फाेिसस, काेल इंडिया, एचडीएफसी बॅंक, टाटा पाॅवर, हिराे माेटाेकाॅर्प, एनटीपीसी, अायटीसी, भारती एअरटेल. अॅिक्सस बँक, अायसीअायसीअाय बँक, भेल.