आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार सत्रांनंतर बाजारात पुन्हा तेजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या चार सत्रांमधील पडझडीनंतर बाजार अखेर सावरला. जुलै महिन्यातील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत संपण्याअगाेदर बाजारात झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्स १०४ अंकांनी वाढून २७,५०० अंकांच्या वरच्या पातळीवर बंद झाला.

जगभरातल्या भांडवल बाजारांचे लक्ष सध्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडे लागले अाहे. यंदाच्या वर्षात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची शक्यता अाहे. त्याचा काय परिणाम हाेईल, याची चिंता गुंतवणूकदारांना अाहे. परंतु बाजारातील तज्ज्ञांनी भारतासह उगवत्या बाजारपेठेवर व्याजदर वाढीचा परिणाम हाेणार नाही, असा अंदाज व्यक्त केल्यामुळे माेठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यातील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत संपत
असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत खरेदी केल्यामुळेदेखील बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. पी- नाेट्सच्या माध्यमातून देशात माेठ्या प्रमाणावर विदेशी पैसा येत अाहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसभरात २७,६०९.२९ अंकांच्या कमाल पातळीवर गेला हाेता. गेल्या चार सत्रांत १०४५.७० अंकांच्या पडझडीनंतर सेन्सेक्समध्ये बुधवारी १०४.२० अंकांची वाढ हाेऊन ताे २७,५६३.४३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांक ३८.०५ अंकांनी वाढून ८३७५.०५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
टाॅप गेनर्स : इन्फाेसिस, लुपिन, भेल, टाटा स्टील, हिंदाल्काे.