न्यूयॉर्क- जगातील सर्वात मोठी कंपनी अॅपलच्या शेअर्समध्ये मंगळवारी ऐतिहासिक घसरण झाली. अॅपलचे तिमाही निकाल घोषित होताच कंपनीचे शेअर्स ९ टक्क्यांपेक्षा जास्त गडगडले.
यामुळे तीनच मिनिटांत अॅपलचे मार्केट कॅपिटल (बाजार भांडवल मूल्य) ३.९४ लाख कोटींनी घटून ४३.५ लाख कोटी रुपयांवर आले.
जून तिमाहीत अॅपल कंपनीची कमाई ३२.६ टक्के आणि नफा ३९ टक्क्यांनी वाढला आहे. तरीही कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. वर्ष दर वर्ष आधारावर अॅपलची एकूण कमाई २.३७ लाख कोटी रुपयांनी वाढून ३.१५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. अॅपलचा नफाही ४८,९०० कोटी रुपयांवरून ६७,९५० कोटी रुपये झाला.
पुढील तिमाहीसाठी अनुमान कमीच
सप्टेंबर तिमाहीत कमाई ३.११ लाख कोटी रुपयांवरून ३.२४ लाख कोटी रुपयांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. जून तिमाहीत ग्रॉस मार्जिन ३९.७ टक्के होते. सप्टेंबरमध्ये घटून ३८.५ ते ३९.५ टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. अॅपलने जून तिमाहीत ४.७५ कोटी आयफोन विकले होते. ते वार्षिक आधारावर ३५ टक्के जास्त आहे, मात्र तिमाही आधारावर २२ टक्के कमी आहे. मार्च तिमाहीत ६.११ कोटी आयफोन विकले गेले.
अायफोनची वार्षिक विक्री वाढली, मात्र तिमाहीत २२ टक्के घटली
यामुळे घसरले शेअर्स
>वार्षिक आधारावर कमाई व नफा भलेही वाढला असला तरी तिमाही आधारावर त्यात घसरण झाली. कमाई १४.५ टक्के आणि नफा २१.३ टक्क्यांनी घटला आहे. मार्च तिमाहीत कमाई ३.६८ लाख कोटी व नफा ८६,३६० कोटी रुपये होता. सकल नफाही ४०.८ टक्के होता.
>तिमाही आधारावर चीनमधून कमाई २१ टक्के व अमेरिकेतील ५ टक्के कमी झाली. युरोपमधून कमाईही १५ टक्के घटली आहे.
>आयपॅडची विक्री १.२६ कोटींहून १३ टक्के घटून १.०९ कोटी झाली. आयपॅडद्वारे कमाई ३७,३०० कोटींवरून २३ टक्के घटून २८,७६५ कोटींवर आली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अॅपलवर वॉचबाबत संशयाचे वातावरण