आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारीवर बाजाराचे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांत गेल्या आठवड्यात (बुधवार ते मंगळवार) वाढ नोंदवण्यात आली. तिमाही आकडेवारी जाहीर होण्याआधी नीचांकी पातळीवर खरेदी वाढल्यामुळे ही वाढ दिसून आली. नोटाबंदीमुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामाची घसरण आता पूर्ण झाली आहे. आता बाजाराचे सर्व लक्ष कंपन्यांच्या तिमाही आकडेवारीकडे लागले आहे. कंपन्यांचे उत्पन्न तसेच भविष्यात वाढीचा अंदाज सकारात्मक नोंदवण्यात आला तर बाजारात सकारात्मक उत्साह दिसून येईल. कंपन्यांची आकडेवारी तसेच त्यांचा महसूल यावर बारीक लक्ष ठेवावे लागेल.  

केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करणार असल्यामुळे बाजाराची धारणा सतर्कतेत कायम राहण्याचीच जास्त शक्यता आहे. अर्थसंकल्पामुळेच सध्या बाजारात मर्यादेत व्यवहार होत आहेत. वास्तविक त्याआधी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. यामुळेदेखील बाजारात मर्यादेत व्यवहार होत आहे.  यादरम्यान मोजक्या शेअरमध्ये घटनाक्रमानुसार तेजी दिसण्याची शक्यता कायम अाहे. मात्र, वाढ नोंदवण्याआधी बाजारात काही प्रमाणात घसरण होण्याचीही शक्यता आहे.  

जागतिक पातळीवर अमेरिकी शेअर बाजारात चौथ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर करण्याचा काळ सुरू होणार अाहे. वॉल स्ट्रीटने विक्रमी पातळीवर उच्चांक गाठला असून कंपन्यांची तिमाही आकडेवारी ही वाढ योग्य ठरवतात की नाही हे बाजार पाहणार आहे. गुंतवणूकदार तसेच उद्योजक डोनाल्ड ट्रम्प बुधवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात मतदानाच्या निकालानंतरची ही त्यांची पहिलीच पत्रकार परिषद आहे. त्यांनी निवडणुकीच्या काळात अमेरिकेच्या धोरणामध्ये बदल करण्याचे अाश्वासन दिले होते. त्यासंदर्भातील मुद्दे या पत्रकार परिषदेत स्पष्ट होतील. ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापासून अमेरिकी शेअर बाजार उच्चांकी पातळीवर कायम आहे. कर कपात, सुलभ कायदे तसेच आर्थिक प्रोत्साहन देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिलेले आहे.  

अमेरिकी बाजारात आठ नोव्हेंबर पासून सलग होत असलेल्या वाढीची गती सध्या कमी झाली आहे. सध्या अमेरिकी बाजारातील वाढ मंदावली असून ट्रम्प यांनी दिलेली आश्वासने ते पूर्ण करू शकतात की नाही याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. एसअँडपी ५०० निर्देशांकाचा सध्याचा पीई १७ असून गेल्या १० वर्षांतील याची सरासरी १४ आहे.

पुढील काळात नीचांकी पातळीवर खरेदी होऊ शकते. त्यामुळे बाजाराची धारणा सतर्कतेसह सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कन्सॉलिडेशनमध्ये अडकण्याआधी निफ्टीमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या आठवड्यात निफ्टी चांगल्या स्थितीत दिसत आहे. मंगळवारी एनएसई निफ्टी ८२८८.६० वर बंद झाला. वाढीचा विचार केल्यास निफ्टीला पहिला रेझिस्टन्स ८३१२ च्या जवळपास दिसेल. हा एक छोटा रेझिस्टन्स असेल. चांगल्या व्हॉल्यूमसह खरेदी वाढली तर हा कायम राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निफ्टीला पहिला रेझिस्टन्स ८३८२ च्या जवळपास मिळेल. हा एक चांगला रेझिस्टन्स होऊ शकतो आणि या पातळीच्या जवळपास बाजार कन्सॉलिडेट होऊ शकतो. जर निफ्टी या रेझिस्टन्स पातळीच्या वर गेल्यास त्याला पुढील रेझिस्टन्स ८४०६ च्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे. या पातळीवर मिळणारा हा एक मजबूत रेझिस्टन्स असेल. या पातळीवर काही तांत्रिक सुधारणांदरम्यान बाजार कन्सॉलिडेट होईल. 

घसरणीचा विचार केल्यास निफ्टीला पहिला चांगला आधार ८२२४ च्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. हा आधार तुटला तर यामध्ये आणखी घसरण दिसण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निफ्टीत हळूहळू घसरण होऊन ८१३३ च्या पातळीवर जाऊ शकतो. ही एक चांगली पातळी असेल. या स्थितीत नीचांकी पातळीवर चांगली खरेदी दिसण्याची शक्यता आहे. 
शेअरमध्ये या आठवड्यात नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी तसेच स्टेट बँक आॅफ इंडिया चांगल्या स्थितीत दिसत आहेत. नॅशनल अॅल्युमिनियम कंपनीचा सध्याचा बंद भाव ६७.९५ रुपये आहे. हा ७०.५० रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो, घसरणीत याला ६४.७५ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा. एसबीआयचा सध्याचा बंद भाव २४७.८५ रुपये असून यामध्ये २५४ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. घसरणीत याला २४२ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा.

-लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
विपुल वर्मा, vipul.verma@dbcorp.in