मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण विशेष करून चीन शेअर बाजारात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना थाेडाफार दिलासा मिळाला. त्यामुळे बाजारात काही बड्या समभागांची निवडक खरेदी हाेऊन सेन्सेक्समध्ये ४२४ अंकांची वाढ झाली. जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्याेग, बँक, अर्थतज्ज्ञ यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये मंदीतून मार्ग काढण्याबाबत विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यामुळेही बाजाराला माेठा दिलासा मिळाला. रिझर्व्ह बँक आधार दराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असल्यामुळे वित्त समभागांना मागणी आली. त्यातच रुपयाच्या मूल्यात वाढ हाेऊन ताे डाॅलरच्या तुलनेत काहीशा चांगल्या पातळीवर गेल्यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहात भर पडली.
जागतिक शेअर बाजारातील वातावरणामुळे दुपारच्या सत्रात सेन्सेक्सने २५,४११ अंकांची कमाल पातळी गाठली. िदवसअखेर सेन्सेक्स ४२४.०६ अंकांची उसळी घेत २५,३१७.८७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दोन सत्रात सेन्सेक्समध्ये ८७०.९७ अंकांची घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेदेखील ७,७०० अंकांची पातळी गाठली. िनफ्टीमध्ये १२९.४५ अंकांनी वाढ हाेऊन ताे ७६८८.२५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
टॉप गेनर्स : आयसीआयसीआय बँक, वेदांत, एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक, टाटा माेटर्स, एचडीएफसी, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, िरलायन्स, मारुती सुझुकी, विप्राे, आेएनजीसी, हिंदाल्काे.
सेन्सेक्समध्ये ४२४ अंकांची वाढ
चीनच्या शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण हाेते. चीनने प्राप्तिकरात कपात तसेच समभाग किमतीतील घसरण आणि अल्पमुदतीत हाेत असलेल्या सट्टेबाजीला लगाम घालण्यासाठी सर्किट ब्रेकर बनवण्याचा निर्णय घेतल्याने चीन, हांॅगकांॅग बाजारात चांगली वाढ झाली. पण जपानच्या शेअर बाजारात पडझड झाली. जर्मनीच्या निर्यात - आयातीमधील वाढीमुळे युराेप शेअर बाजारात चांगली वाढ झाली.
बाजार स्थिरावण्याची शक्यता वाढली
पुढच्या आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबतचा निर्णय घेणार असल्याने त्यानंतर ताे स्थिरावतील. जागितक बाजारातील चिंतेच्या पार्श्वभूमीवर माेदी यांच्या अध्यक्षतेखाली काॅर्पाेरेट जगताबराेबर झालेल्या बैठकीचादेखील चांगला परिणाम झाला - विनाेद नायर, संशाेधन प्रमुख, जिआेजित बीएनपी परिबा
बड्या समभागांना मागणी आली
मूल्याधिष्ठित समभाग खरेदीमुळे किंमत संवेदनशील तसेच बड्या समभागांना मागणी आली. तीही चीनच्या आयातीमध्ये झालेल्या घसरणीची गुंतवणूकदारांना चिंता वाटत आहे. - प्रमित ब्रह्मभट, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हेरासिटी ग्रुप