Home | Business | Share Market | BSE IPO of 1243 crore opens today

बीएसईचा 1243 कोटींचा आयपीओ आज खुला, शेअर लिस्टिंग होणारा देशातील पहिला शेअर बाजार

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 23, 2017, 04:02 AM IST

आशियातील सर्वात जुना शेअर बाजार असलेला बाॅम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईचा आयपीओ सोमवारी खुला होत आहे.

 • BSE IPO of 1243 crore opens today
  नवी दिल्ली - आशियातील सर्वात जुना शेअर बाजार असलेला बाॅम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईचा आयपीओ सोमवारी खुला होत आहे. ९ हजारांपेक्षा जास्त समभागधारकांच्या बीएसईने आयपीओच्या माध्यमातून १२४३ कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इश्यूचा प्राइस बँड ८०५-८०६ रुपये निश्चित केला आहे. ऑफर तीन दिवस म्हणजे २३ ते २५ जानेवारीपर्यंत खुली असेल.

  कमीत कमी १८ शेअर्ससाठी अर्ज करता येईल. यानंतरही अर्ज १८ च्या प्रमाणात असेल. बीएसईने १.५४ कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले आहेत. २८.२६ % होल्डिंगची विक्री होईल. शेअर्सची फेस व्हॅल्यू २ रुपये ठेवली आहे. बीएसईच्या शेअर्सची नोंदणी स्वत:च्या नव्हे तर एनएसईमध्ये होईल. सेबीच्या नियमानुसार कोणताही शेअर बाजार आपल्या शेअर्सची लिस्टिंग करू शकत नाही. एनएसईही आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. सेबीकडे तसा अर्जही करण्यात आला आहे. याचा इश्यू जवळपास १०,००० कोटी रुपयांचा असेल. हा देशातील सर्वांत मोठा आयपीओ असेल.
  बीएसईमध्ये ५,८६८ नोंदणीकृत कंपन्या आहेत. या हिशेबाने हा जगातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे. असे असले तरी बाजार मूल्याच्या दृष्टीने याचा क्रमांक दहाव्या लागतो. बीएसईचे बाजार मूल्य ११०.२३ लाख कोटी रुपये आहे. सुमारे १३०० लाख कोटी रुपयांसह न्यूयॉर्क शेअर बाजार पहिल्या क्रमांकावर आहे.
  ८०५-८०६ रुपये प्राइस बँड
  इश्यूसाठी ८०५ - ८०६ रु. प्रति शेअर किंमत ठेवली आहे. २०१७ -१८च्या अंदाजित उत्पन्नाच्या आधारे या किमतीवर पीई प्रमाण १७ होते. एमसीएक्सचा पीई ३१ आहे. नॅसडॅकसह जगातील प्रमुख बाजारांचा पीई १५- २२ दरम्यान आहे.

Trending