आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ टक्क्यांची घसरण, बाजारात हाहाकार; 'मोदी'राजमध्ये मिळालेली सर्व वाढ गमावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक अर्थव्यवस्थेची खराब स्थिती आणि बँकांच्या अडकलेल्या कर्जाचा (एनपीए) वाढलेला आकडा यामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात
आठवी सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स ८०७.०७ अंकांनी म्हणजेच ३.४ टक्क्यांनी घसरून २२,९५१.८३ च्या पातळीवर आला. अाठ मे २०१४ नंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातीलदेखील ही नीचांकी पातळी आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी २३९.३५ म्हणजेच ३.३२ टक्क्यांनी घसरून ६९७६.३५ च्या पातळीवर आला आहे. सध्या बाजारात आणखी घसरणीची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. िनफ्टी ६७०० ते ६८०० पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मोदी सरकार आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली सर्व वाढ बाजाराला गमावावी लागली आहे.

घसरणीची कारणे : जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती खराब असल्याचे मत अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जेनेट येलेन यांनी बुधवारी व्यक्त केले. यामुळे अमेरिकेवरदेखील परिणाम होऊ शकतो. तरी देखील पुढील काळात त्यांनी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले. या दोन्ही गोष्टी भारतासाठी नकारात्मक आहेत. गुुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकी कच्चे तेल २६.३२ डॉलर प्रतिबॅरलवर आले. हे १३ वर्षांतील नीचांकी पातळीच्या जवळ आहेत. ब्रंेट ३० डॉलरच्या जवळपास होता. जुलै २०१४ च्या १०६ डाॅलरपेक्षा आतापर्यंत ७० टक्के घसरण झाली आहे. जगातील अतिरिक्त कच्चे तेल गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (आयईए) व्यक्त केला आहे. अनेक सरकारी बँकांचा एनपीए ४० टक्के वाढला आहे. देशाील सर्व बँकाच्या एनपीएपैकी ८५ टक्के सरकारी बँकांकडेच आहे. यामुळे नफा कमी होत आहे. एसबीआयच्या तिमाही आकडेवारीत नफ्यात ६७ टक्क्यांची कपात झाली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, घसरणीतही साधा संधी, बाय ऑन डीपचा नियम पाळा