आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीमुळे सेन्सेक्स ३०८ अंकांनी खाली, २५ हजारांची नीचांकी पातळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अपुर्‍या मान्सूनची चिंता, रुपयाच्या अवमूल्यनाने गाठलेला दाेन वर्षांचा नीचांक आणि चीन बाजारातील विक्रीचा मारा या सगळ्या गाेष्टींनी बाजाराची साफ िनराशा केली. बाजारात झालेल्या चाैफेर विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स ३०८ अंकांनी घसरून २५ हजार अंकांच्या खाली म्हणजे २४,८९३.८१ अंकांच्या गेल्या पंधरा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

दिवसभरामध्ये चलन बाजारात डाॅलरच्या तुलनेत रुपया ६६.८५ च्या पातळीपर्यंत घसरला. शांघाय शेअर बाजारातही विक्रीचा मारा झाल्याचा बाजारावर विपरीत परिणाम झाला. चीनने ७.३ टक्के आर्थिक वाढीची आकडेवारी जाहीर केली हाेती, पण त्यात आता सुधारणा करून ती ७.४ टक्के असल्याचे जाहीर केले.
चीनच्या आकडेवारीमुळे बाजाराची साफ निराशा झाली. त्यातच आशियाई शेअर बाजारांच्या पडझडीची भर पडल्याचे बाेनांझा पाेर्टफाेलिआेचे संचालक सत्यप्रकाश गाेएल यांनी सांगितले. हवामान खात्याते अगाेदर ८८ टक्के सरासरी पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. पण आता हा अंदाज ८२ टक्क्यांवर आणल्यामुळे बाजाराचा मूड गेला आणि एका ठरावीक श्रेणीत व्यवहार झाले.

हे समभाग आपटले
अ‍ॅक्सिस बँक, वेदांत, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्काे, लुपिन, भेल. डाॅ. रेड्डीज, काेल इंडिया, सन फार्मा, एल अँड टी, स्टेट बँक, टाटा स्टील, गेल, इन्फाेसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, आयटीसी, भारती एअरटेल, बजाज आॅटाे, हीराे माेटाेकाॅर्प.

निफ्टीतही ९६ अंकांची घसरण
सेन्सेक्स २५,३०२.९८ अंकांच्या सकारात्मक पातळीवर उघडला आणि त्याने २५,३८७.३२ अंकांची कमाल पातळी सकाळच्या सत्रात गाठली. परंतु ती फार काळ तग धरू शकली नाही. नंतर झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या खाली म्हणजे २४,८५१.७७ अंकांच्या पातळीवर आला. दिवसअखेर सेन्सेक्स ३०८.०९ अंकांनी घसरून २४,८९३.८१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांकदेखील ९६.२५ अंकांनी घसरून ७६,५०० अंकांच्या खाली म्हणजे ७५५८.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला.