आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स ८४ अंकांनी घसरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेच्या तणाव चाचणीमध्ये बँकांच्या मालमत्तेचा दर्जा तिमाहीपर्यंत आणखी घसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे, याचा बाजारावर नकारात्मक परिणाम हाेऊन बँक समभागांना फटका बसला. बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स ८४ अंकांनी घसरून २७,८११.८४ अंकांवर बंद झाला.

बँकांमध्ये भांडवली गुंतवणुकीची याेजना असल्यामुळे प्रारंभी बँक समभाग तेजीत हाेते. परंतु रिझर्व्ह बँकेच्या या तणाव चाचणीमुळे त्यावर पाणी फेरले आणि बँक समभागांना फटका सहन करावा लागला संपूर्ण देशभरात अपेक्षेपेक्षा लवकर मान्सून सक्रिय झाल्याने बाजाराला थाेडाफार दिलासा मिळाला. दिवसअखेर सेन्सेक्स ८४.१३ अंकांनी घसरून २७,८११.८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी १६.९० अंकांनी घसरून ८३८१.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला. तंत्रज्ञान आणि स्थावर मालमत्ता समभागांना मात्र खरेदीचा पाठिंबा मिळाला.
बातम्या आणखी आहेत...