आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्सचा एक महिन्याचा उच्चांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही निवडक कंपन्यांनी चाैथ्या तिमाहीत नफा कमावण्यामध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे बाजारात पुन्हा उत्साहाचे वारे वाहिले. त्यातून व्याजदर कमी हाेण्याच्या अपेक्षा उंचावल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी चाैफेर खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स १४८ अंकांची उसळी मारत २७,९५७.५० अंकांच्या एका महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कमाल पातळीवर उघडला आणि दुपारच्या सत्रात त्याने २८ हजार अंकांची पातळी झटकन पटकावली.

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात हाेण्याची आशा बाजाराला वाटत आहे. त्यामुळे दुपारनंतर खरेदीचा जाेर वाढून सेन्सेक्स २८,०७१.१६ अंकांच्या कमाल पातळीवर गेला; परंतु नंतर बँकांच्या समभागांवर नफारूपी विक्रीचा ताण येऊन सेन्सेक्स २८ हजार अंकांच्या खाली गेला. परंतु, दिवसअखेर १४८.१५ अंकांची वाढ नाेंदवत सेन्सेक्स २७,९५७.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला. २३ एप्रिलनंतर जवळपास महिनाभरानंतर सेन्सेक्स २८ हजार अंकांच्या पातळीवर गेला. साप्ताहिक आधारावर सेन्सेक्सने ६३३.५० अंकांची आणि या आठवड्यात सलग ितसर्‍या िदवशी चढती कमान कायम राखली आहे.

आशियाई शेअर बाजारातील तेजी आणि युराेेप शेअर बाजाराची चांगली सुरुवात याचादेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

बाजारावर झाला सकारात्मक परिणाम
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात चाैथ्या तिमाहीत २३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीत समभागाचा भाव पाच टक्क्यांनी वाढला; परंतु नंतर झालेल्या नफारूपी विक्रीत समभागाची किंमत २.३८ टक्क्यांनी घसरून २८२.४५ रुपयांवर बंद झाला. आयटीसीच्या कामगिरीमुळेदेखील या समभागाने गुंतवणूकदारांचे
लक्ष वेधले.

टाॅप गेनर्स
एचडीएफसी लि., टीसीएस लि., सन फार्मा, आेएनजीसी, एल अँड टी, भेल, टाटा माेटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, गेल, काेल इंडिया, डाॅ. रेड्डीज लॅब, बजाज आॅटाे, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा.
बातम्या आणखी आहेत...