आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुडीजने वाढवला मान, बाजारात तेजीची कमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या मुडीज संस्थेने भारताचे पतमानांकन स्थिरवरून सकारात्मक केल्याने गुरुवारी शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसला. सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात तेजी आली. त्यामुळे सेन्सेक्स १७७.४६ अंकांच्या उसळीसह २८,८८५.२१ वर पोहोचला. हा सेन्सेक्सचा महिनाभरातील उच्चांक आहे. निफ्टीने ६३.९० अंकांच्या कमाईसह ८,७८५.५० पर्यंत मजल मारली. मुडीजने देशाचा पत मान वाढवल्याने शेअर बाजारात तेजीच्या आलेखाची कमान उंचावली.

ब्रोकर्सनी सांगितले, सकाळच्या सत्रात निर्देशांकांची सावध सुरुवात झाली. काही प्रमाणात नफा वसुली दिसून आली. त्यामुळे निर्देशांक घसरणीच्या पातळीत आले होते. त्यानंतर मुडीजने देशाचे पतमानांकन सकारात्मकवर नेल्याचे वृत्त आले आणि बाजाराचा मूड बदलला. उत्साही गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठ्या खरेदीने सेन्सेक्ससह निफ्टीला तेजीचे बळ दिले.