आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची झेप, बाजाराला व्याजदर कपातीची आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरासरीपेक्षा जास्त पाऊस हाेणार असल्याच्या अपेक्षा वाढण्याबराेबरच त्याच्या जाेडीला रिझर्व्ह बँकदेखील व्याजदर कपात करून सुखद धक्का देणार, अशी आशा बाजाराला वाटत आहे. त्यातूनच झालेल्या तुफान खरेदीमध्ये स्थावर मालमत्ता, बँका, वाहन कंपन्यांच्या समभागांना मागणी आली. त्यामुळे साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजारात आलेल्या तेजीमध्ये सेन्सेक्सने ४१४ अंकांची उसळी घेतली. गेल्या सात सत्रांत सेन्सेक्सने १३५९.२३ अंकांची कमाई केली आहे. फेब्रुवारीपासूनची ही सर्वात दीर्घकाळ तेजी आहे. निफ्टीनेदेखील ८३०० अंकांची महत्त्वाची पातळी सर केली.

आर्थिक पेचप्रसंगातून सुटण्यासाठी ग्रीसने कर्जदारांना एक नवीन प्रस्ताव दिला असल्याच्या वृत्तामुळे जागतिक बाजारात तेजी आली. व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा चांगला पाऊस पडत आहे. हा कल असाच कायम राहिल्यास रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी हाेण्याची पुन्हा आशा निर्माण झाली असल्याचे मत रिलायन्स सिक्युरिटीजचे संशाेधनप्रमुख हितेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.

व्याजदर कपातीच्या हिंदाेळ्यावरच बाजारात खर्‍या अर्थाने तेजी आली. व्याजदर संवेदनशील असल्याने समभागांची तुफान खरेदी झाली. त्यामुळे क्षेत्रीय निर्देशांकानादेखील बळकटी मिळाली. आशियाई शेअर बाजारातही चांगली वाढ झाली, तर दुपारच्या सत्रानंतर युराेप बाजारातही तेजी आली.

टाॅप गेनर्स : अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फाेसिस, एचडीएफसी, स्टेट बँक, टीसीएस, भेल, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, आयटीसी, टाटा माेटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, गेल, काेल इंिडया िल.

दिवसअखेर ४१४ अंकांची वाढ
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कमाल पातळीवर उघडला आणि संपूर्ण दिवसभर ताे सकारात्मक पातळीत राहिला. मधल्या सत्रात ताे २७,७८२.३१ अंकांच्या कमाल पातळीवर पाेहोचला. दिवसअखेर ४१४.०४ अंकांची वाढ नाेंदवत सेन्सेक्स २७,७३०.२१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. आठ मे राेजीच्या ५०६.२८ अंकांच्या वाढीनंतर सेन्सेक्सची एकाच दिवसातील ही माेठी कमाई आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक दिवसअखेर १२८.१५ अंकांनी वाढून ८३५३.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...