आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावध व्यवहारामुळे सेन्सेक्स 43 ने खाली, कंपन्यांचे अधिवेशनाकडे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कंपन्यांची तिमाहीतील आर्थिक कामगिरी फारशी उत्साहवर्धक नसेल, असे बाजाराला वाटत आहे. त्यातून मंगळवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार करणे पसंत केले. त्यामुळे गेल्या आठवड्यात तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेलेला सेन्सेक्स सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ४३ अंकांनी घसरला.

बाजारात लक्षणीय घसरण झाली होती. परंतु उशिरा झालेल्या व्यवहारांमध्ये पुन्हा सुधारणा होऊन निफ्टीने ८६०० अंकांची पातळी गाठली. सकाळच्या सत्रात झालेली विक्री दुपारच्या सत्रानंतर मात्र खरेदीत बदलली. त्यामुळे सेन्सेक्समध्ये सुधारणा झाली.

खरेदीचा जोर
सकाळीखरेदीमुळे सेन्सेक्स २८,५४४.२८ अंकांच्या पातळीवर उघडला. पण नंतर विक्रीमुळे तो २८,३१९.८३ अंकांच्या पातळीवर आला. आाशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण असले तरी युरोप शेअर बाजारातील तेजीमुळे खरेदी वाढली. त्यामुळे दिवस अखेर सेन्सेक्स ४३.१९ अंकांनी घसरून २८,२४०.१२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ६.४० अंकांनी घसरून ८६०३.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...