आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या घोषणांमुळे सेन्सेक्सची झेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्याबराेबरच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन महत्त्वपूर्ण याेजनांची घाेषणा केल्यामुळे बाजारात उत्साहाचे वारे निर्माण झाले. त्यामुळे ग्रीकमधील पेचप्रसंगाची चिंता काहीशी बाजूला ठेवत बाजारात झालेल्या तुफान खरेदीत सेन्सेक्समध्ये १६० अंकांची चांगली वाढ झाली.

जूनमधील फ्युचर अ‍ॅड आॅप्शन व्यवहाराचा शेवटचा दिवस लक्षात घेऊन बाजारात गुंतवणूकदारांनी आपले व्यवहार आटाेक्यात ठेवले. गेल्या दहा सत्रांमध्ये सेन्सेक्सने सलग नऊ सत्रात चांगली वाढ नाेंदवली. सेन्सेक्स २७,६६०.२२ अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला.

त्यानंतर विक्रीच्या तणावामुळे त्यात आणखी घट हाेऊन ताे २७,६३५.७६ अंकांच्या पातळीवर आला, परंतु नंतर पुन्हा नव्याने झालेल्या खरेदीत सेन्सेक्स १६६.३० अंकांनी वाढून २७,८९५.९७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ३७.१५ अंकांनी वाढून ८४२३.१५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...