आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्समध्ये ७४ अंकांची वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वसाधारणपेक्षा चांगला पाऊस पडत असल्याचा आनंद बाजारात पसरला असतानाच जागतिक बाजारातील भक्कम स्थितीमुळे विदेशी निधीचा आेघ वाढल्याने बाजाराच्या आनंदात आणखी भर पडली. त्यातून झालेल्या खरेदीत सेन्सेक्समध्ये ७४ अंकांची वाढ झाली. विशेष म्हणजे सलग आठव्या सत्रात बाजारातील तेजी कायम राहिली. या आठ िदवसांत सेन्सेक्सने १,४३३ अंकांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्स २७,७६०. ११ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. परंतु नंतर वरच्या पातळीवर झालेल्या नफारूपी विक्रीमध्ये सेन्सेक्स नकारात्मक पातळीवर आला. नंतर पुन्हा ताे २७,८८२.६६ अंकांच्या पातळीपर्यंत उसळला. दिवसअखेर सेन्सेक्स ७४.१६ अंकांनी वाढून २७,८०४.३७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांक २८.४५ अंकांनी वाढून ८३८१.५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अमेरिका दौर्‍यामुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारात विदेशी निधीचा आेघ वाढला असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. या गुंतवणूकदारांनी साेमवारी ६५१.३१ काेटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. ग्रीसने उपाय शाेधून काढल्यामुळे देखील बाजारात तेजी आली.
बातम्या आणखी आहेत...