आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गंगाजळीत वाढ, ३५९.७५ अब्ज डॉलरवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील विदेशी चलन एक एप्रिलपर्यंत ४२० कोटी रुपयांनी वाढून ३५९.७५ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. या आधी २५ मार्चला संपलेल्या सप्ताहात विदेशी चलन ३५५.५६ अब्ज डॉलर होते. या दरम्यान १८ मार्चच्या तुलनेत ३८ कोटी रुपये कमी झाले आहेत.
भारतीर रिझर्व्ह बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एक मार्चला िवदेशी गंगाजळीमध्ये सर्वात मोठा वाटा असलेला विदेशी चलन साठा ३३५.६८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यामध्ये एका आठवड्यातच ३५३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या चलनातही बदल झाला असून ते २०.११ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे. २५ मार्चला ते १९.३३ अब्ज डॉलरवर होते.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) जवळ असलेला सुरक्षित फंड कमी झाला असून २५ मार्चमध्ये असलेल्या २.६० अब्ज डॉलरच्या तुलनेत तो २.४५ अब्ज डॉलरच राहिला आहे.