Home | Business | Share Market | Buy less than the market rate guaranteed brother starts to supply about new arrivals

बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी

अफसर कारभारी | | Update - Dec 21, 2016, 04:22 AM IST

बाजार | लातूरमध्ये ५ ठिकाणी आधारभूत किंमत खरेदी केंद्रे - सोमवारी ३ हजार क्विंटल नव्या तुरीची आवक - कमाल ५२००, तर किमान ४७०० प्रतिक्विंटल भाव

 • Buy less than the market rate guaranteed brother starts to supply about new arrivals
  लातूर : बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच गेल्या दहा-बारा दिवसांत दरात कमालीची घसरण होऊन सरकारने निश्चित केलेल्या हमी भावापेक्षा खाली तिचा दर आला आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने जिल्ह्यात पाच ठिकाणी आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

  जिल्ह्यात तुरीच्या राशीला काहीसा वेळ असला तरी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटकातून नवीन तूर विक्रीला येत आहे. सोमवारी तीन हजार क्विंटल नव्या तुरीची आवक झाली होती. तिला कमाल ५२००, तर किमान ४७०० प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या आठवड्यात किमान भाव ५२०० रुपये होता.
  परंतु त्यात ५०० रुपयांची घसरण झाली आहे. अद्याप सर्वत्र राशीही सुरू झाल्या नाहीत. त्याअगाेदरच भाव ४७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. शासनाने तुरीचा हमी भाव ५०५० जाहीर केला आहे. बाजारात हमीपेक्षा कमी भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

  यंदा चांगला पाऊस झाल्याने आणि रोगराईचा प्रादुर्भाव टळल्याने तुरीचे विक्रमी उत्पादन निघणार आहे. त्यामुळे आणखी पंधरा दिवसांनंतर बाजारात तुरीचा मोठ्या प्रमाणात अोघ वाढणार आहे. आवक वाढल्यानंतर तुरीचा भाव ४२०० ते ४३०० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
  बाजारातील हालचाली पाहता सरकारने तुरीचा भाव पाच हजारांच्या खाली येऊ नये म्हणून तयारी केली होती. त्यानुसार येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने आधारभूत किमतीवर खरेदी केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून चार दिवसांपूर्वी अहमदपूर, चाकूर, उदगीर आणि औसा येथे हमी भावाची खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. लातूरच्या मार्केट यार्डात नाफेडच्या वतीने स्वतंत्र खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

  कडधान्याच्या दरात घट
  तुरीबरोबर सर्वच डाळवर्गीय धान्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. आठवडाभरात मूग आणि उडदाचा भाव क्विंटलमागे पाचशे रुपयांनी कमी झाला आहे. मूग ४३०० ते ४७००, तर उडीद ६९०० ते ३००० दरम्यान विक्री होत आहे. डाळीत सर्वाधिक वापर तुरीचा होतो. त्यातच अन्य डाळीचे भावही पडू लागले आहेत.
  दरात आणखी घसरण होईल
  - गेल्या पाच महिन्यांपासून तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यंदा चांगले उत्पादन निघणार असल्याचा हा परिणाम आहे. कोणत्याही मालाची आवक वाढल्यास भाव पडतातच. आणखी पंधरा दिवसांनंतर तुरीचा भाव ४५०० रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे.
  - अशोक अगरवाल, आडत व्यापारी

Trending