आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील मंदीत वाढ, जगभरासाठी ठरेल संकट : आयएमएफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या अर्थव्यवस्थेत मंदी वाढत असून त्यामुळे जागतिक पातळीवरील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेसमाेर मोठे संकट उभे आहे. चीनच्या वतीने अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात येत असली तरी मंदी त्यापेक्षा मोठी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय मुद्रा कोश म्हणजेच आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ केन रोगोफ यांनी व्यक्त केले आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला हा देश खराब परिस्थितीत असून यामुळे जागतिक आर्थिक वाढीवर त्याचा परिणाम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिनी अर्थव्यवस्थेत सलग होत असलेल्या घसरणीचा उल्लेख करत चीनमध्ये मोठी राजकीय क्रांती दिसत असल्याचे मत रोगोफ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. माझ्या माहितीप्रमाणे चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत देण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारी पेक्षा तेथील परिस्थिती जास्त खराब असल्याचेही त्यांनी सांगितले. आधी दोन अंकांत असलेला चीनचा आर्थिक विकासदर कमी होऊन ६.९ टक्क्यांवर आला आहे. चालू आर्थिक वर्षात ६.५ ते टक्के विकास दराचे उद्दिष्ट चीन सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्टदेखील साध्य करणे अवघड असल्याचे मत चीनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक वाढीचे चीन प्रमुख इंजिन राहिला असून चीनची अर्थव्यवस्था मंदावली तर त्याचा जागतिक पातळीवर परिणाम होणारच आहे, असे मतही रोगोफ यांनी मांडले.
आंतरराष्ट्रीय प्रमाणाचा विचार केल्यास चीनवरील कर्ज जीडीपीच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचे मत गेल्या आठवड्यातच बँक अॉफ इंटरनॅशनलच्या वतीने व्यक्त करण्यात आले होते. युरोपीय अर्थव्यवस्था तसेच अमेरिकेने कोणत्याही मंदीच्या आधी स्वत:ला सावरण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले आहे.
६.९ टक्केराहिला चीनचा विकास दर, आधी दोन अंकांत होता
६.५ तेटक्के विकासदराचे यंदाचे उद्दिष्ट, त्यातही अडचणी येण्याची शक्यता
रोजगारात कपातीची शक्यता
चीनचीदूरसंचार कंपनी हुवेईच्या वतीने भारतात पूर्ण निर्माण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर चीनमधील सरकारी मीडियाने रोजगार कपात होण्याची शक्यता वर्तवली असून सतर्क राहण्याची सूचना केली आहे. तसेच यामुळे जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन आणि भारत यांच्यात स्पर्धा वाढणार असल्याचीही चिंता व्यक्त केली आहे. चीनमधील उत्पादन कंपन्या भारतात स्थलांतरित होत असून यामुळे चीनने चिंता व्यक्त करण्याची आवश्यकता असल्याचे मत सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये व्यक्त करण्यात आले. मोबाइल निर्मिती क्षेत्र भारतात स्थलांतरित झाले तर चीनमध्ये रोजगार कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे.
कोणताच देश चीनमधील भरपाई करू शकत नाही
जागतिकविकासासाठी कलॅमिट्स हार्ड लँडिंगची आवश्यकता असल्याचे रोगोफ यांनी सांगितले. याकडे दुर्लक्ष करू शकत नसल्याचे ते म्हणाले. चीनमधील कर्जाची समस्या पाहिल्यास चीनचा आर्थिक विकास कर्जावर आधारित असल्याचे पाहायला मिळते. मात्र, ही स्थिती कायम राहू शकत नाही. चीन वेगळा देश आहे, तेथे सर्व काही सरकारी असून मंदीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे सर्व सांगत असले तरी सत्यस्थिती तशी नसल्याचे रोगोफ म्हणाले. चीनमधील हार्ड लँडिंगमुळे समस्या वाढणार आहे. त्याला पर्याय युरोप किंवा जपान ठरू शकत नाही. काही दिवसांसाठी भारताला त्याच्या समकक्ष ठेवू शकत असले तरी चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार पाहिल्यास भारत खूपच मागे आहे. त्यामुळे तो चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे होणारी हानी कमी करू शकत नसल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...