आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनी बाजारात घाबरगुंडी; देशात सेन्सेक्सची घसरगुंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चीनमधील पडझडीचा सरळ परिणाम भारतीय बाजारावर झाल्याचे दिसून आले. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी १.७ टक्क्यापेक्षा जास्त खाली आला. ग्रीकला युराेझाेनमधून काढता पाय घ्याव्या लागण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच शांघाय शेअर बाजारातही पडझड झाल्याचा माेठा परिणाम बाजारावर झाला. त्यानंतर बाजारात झालेल्या चाैफेर मा-यात सेन्सेक्स ४८३ अंकांनी घसरून २८ हजार अंकांच्या पातळीखाली गेला.

बाजारात विक्रीचा मारा इतका जबरदस्त हाेता की त्यात धातू अाणि वाहन समभागांना माेठा फटका बसला. डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे पुन्हा नव्याने अवमूल्यन झाल्यामुळेदेखील बाजाराचा मूड गेला. प्रामुख्याने अाशियाई शेअर बाजारात माेठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीचा जास्त परिणाम बाजारावर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक खालच्या पातळीवर उघडला अाणि त्यानंतर ताे अाणखी २८ हजार अंकांच्या खाली म्हणजे २७,६३५.७२ अंकांच्या पातळीवर गेला. दिवसअखेर सेन्सेक्स ४८३.९७ अंकांची अापटी खात २६,६८७.७२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. याअगाेदर दाेन जूनला सेन्सेक्स ६६१ अंकांनी गडगडला हाेता. त्यानंतरची एकाच दिवसातील सर्वात माेठी पडझड अाहे. विक्रीच्या मा-यात सर्वच क्षेत्रीय निर्देशांक गडगडले. निफ्टीदेखील चाैफेर विक्रीच्या मा-यात ८४०० अंकांच्या खाली गेला. दिवसअखेर निफ्टी १४७.७५ अंकांनी घसरून ८३६३.०५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. मिडकॅप अाणि स्माॅल कॅप समभागांवरदेखील विक्रीचा ताण अाला. जागतिक बाजारात चीन, हाँगकाँग बाजारातही पडझड झाली. वेदांत अाणि टाटा माेटर्सच्या समभागांना माेठा फटका बसला, तर हिंद युनिलिव्हरला मात्र खरेदीचा पाठिंबा मिळाला.

यामुळे बाजार पडला
चीनच्या बाजारात झालेल्या पडझडीचा भारतीय बाजारावरदेखील परिणाम झाला. यामुळे आशियाई बाजारात नकारात्मक परिणाम दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १.७५ टक्के पडझड झाली.
ग्रीस संकटामुळे बाजारात चिंतेचे वातावरण कायम आहे. ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनमधील पडझडीमुळे मेटलच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे सर्व इंडेक्सवर दबाव आला. गुरुवारपासून तीन महिन्यांतील उद्योगाची आकडेवारी जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. आयटीमधील दिग्गज कंपनी टीसीएस आकडेवारी सादर करेल. या वेळी आकडेवारी चांगली येण्याची शक्यता कमी आहे.
बातम्या आणखी आहेत...