आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या मर्यादित राहतील भारतीय बाजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात देशातील शेअर बाजारांनी मर्यादेत व्यवसाय केला. अमेरिकेच्या केंद्रीय बँक असणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात बदल केले नसल्यामुळे सुरुवातीला थोडी वाढ दिसून आली. यामुळे जगभरातील बाजारात सकारात्मकता दिसून आली होती. मात्र, चीनसह जागतिक विकासाच्या बाबत समोर आलेल्या चिंतांमुळे याची सर्व हवा निघाली.

मंगळवारी भारतासह जगभरातील बाजार मोठ्या पडझडीसह बंद झाले. या पडझडीच्या कारणांमध्ये भारतातील कोणत्याही घटनेचा समावेश नाही, तर विकसनशील देशांच्या बाजारात भीतीचे वातावरण तयार झाल्यामुळे ही पडझड झाली. ईपीएफआर डाटानुसार विकसनशील देशांच्या बाजारातून इक्विटी निधीचे ९ सप्टेंबरपर्यंत सलग ११ आठवड्यांपासून पैसे काढले आहेत. यादरम्यान त्यांनी एकूण ३८ अब्ज डॉलर शेअर बाजारातून काढले आहेत. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच (बोफा) च्या मते विकसनशील देशांच्या बाजारातील निधींच्या परिसंपत्तींचे (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) मूल्य ३.३ टक्के कमी झाले आहे. गेल्या ९ वर्षांतील ही सर्वात नीचांकी पातळी आहे. याचा सरळ परिणाम झाला असून यामुळे विकसनशील बाजारांमधून इक्विटी फंडातून या वर्षी आतापर्यंत शेअर बाजारातून ५८ अब्ज डाॅलर काढले गेले आहेत, तर या दरम्यान त्यांनी ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. याच तीन महिन्यांत एमएससीआय इमर्जिंग बाजार िनर्देशांकात १७ टक्क्यांची पडझड नोंदवण्यात आली असून हे चार वर्षांतील सर्वात खराब तीन महिने ठरण्याच्या जवळ पोहोचले आहेत. ही आकडेवारी विकसनशील बाजारांमध्ये असलेल्या दबावाची तीव्रता दाखवते. मात्र, हे आतापर्यंत भारतीय बाजारात दिसून आलेले नाही. असे असले तरी भारतीय बाजारावर याचा परिणामच होणार नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. देशांतर्गत बाजारात विदेशी संस्थांचे गुुंतवणूकदार (एफआयआय) सध्या फक्त विक्री करत आहेत. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार पाचमधील सलग चौथ्या महिन्यात एफआयआयचा विक्री करण्याकडे कल दिसून येत आहे. विदेशी निधींमध्ये एचडीएफसी, टीसीएस, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँकसारख्या प्रमुख शेअरची विक्री होत आहे. यामुळे बाजारात कमजोरीची स्थिती बनत आहे. भारतीय बाजारांमध्ये अजूनही शेअरचे मूल्य विकसनशील बाजारांच्या तुलनेत जास्त आहे. जर जागतिक मंदी सुरूच राहिली तर चिंतेची बाब ठरू शकते. जागतिक बाजारात विक्रीचे हे नवे पर्व कमोडिटीमधील किमतीत पडझडीनंतर आले आहे. दुसरीकडे अमेरिकेत व्याजदरात वाढ हाेण्यामध्ये अनिश्चितता कायम आहे.

पुढील काळात देशांतर्गत बाजारात पडझडीची शक्यता असली तरी मर्यादेत व्यवहार होण्याची आशा आहे. निफ्टीला खाली पहिला आधार ७७५९ अंकाच्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. यानंतर निफ्टीला पुढचा मोठा आधार ७६६७ अंकाच्या जवळपास मिळेल. या पातळीवर बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. जर निफ्टी या पातळीच्या खाली बंद झाला तर येणाऱ्या काळात सध्याची नीचांकी पातळी ठरण्याची शक्यता आहे.
वाढीचा विचार केल्यास निफ्टीला पहिला रेजिस्टेंस ७९११ अंकाच्या जवळपास मिळेल. हा एक इंटरमिडिएट, तरी महत्त्वपूर्ण रेजिस्टेंस असेल. जर निफ्टी याच्याही वरती बंद झाला तर याला सकारात्मक मानले जाईल. अशा स्थितीत निफ्टीला महत्त्वपूर्ण रेजिस्टेंस ८०९० अंकाच्या जवळपास मिळेल. निफ्टी या पातळीच्या वर गेला तरच बाजारात सकारात्मकता परत येईल.
शेअरमध्ये या आठवड्यात टायटन कंपनी लिमिटेड आणि बायोकॉन लिमिटेड चांगल्या स्थितीत दिसून येत आहे. टायटनचा सध्याचा बंद भाव ३१८.८५ रुपये आहे. तो ३३० रुपयांपर्यंतची वाढ मिळवू शकतो, तर खाली ३०९ रुपयांवर त्याला अाधार मिळेल. बायोकॉनचा बंद भाव ४३५.८५ रुपये आहे. तो ४४३ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो, तर ४२४ रुपयांवर त्याला आधार आहे.
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in