आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकिंग शेअरमध्ये सध्या गती राहण्याची लक्षणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात शेअर आणि सेन्सेक्समध्ये चांगली वाढ दिसून आली. यामध्ये फंड आणि व्यावसायिकांच्या वतीने खालच्या पातळीवरील खरेदी याचे मोठे योगदान होते. यामुळे बाजारातील खालच्या पातळीवर मोठा आधार मिळाला होता. वास्तविक जागतिक स्तराचा विचार केला तर डगमग कायम होती. चीनमधील शेअर बाजारात आलेल्या मंदीमुळेदेखील नकारात्मकता वाढली. चीन प्रशासनाने पडझड थांबवण्यासाठी नव्या उपाययोजनांद्वारे कमी कालावधीत शेअर विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली. यावर अंकुश ठेवण्यासाठी नवे नियम तयार केले, तसेच असे व्यवहार करणाऱ्या काही परवानाधारक ब्रोकरचे परवाने रद्द केले. या सर्व उपायांमुळे चीनच्या बाजाराला अस्थायी स्वरूपात दिलासा मिळाला असला तरी यामुळे गुंतवणुकीवर विपरीत परिणाम झाला. यामुळे वातावरण आणखी खराब झाले.

चीनमध्ये होत असलेली पडझड भारतात वाढीचे कारण ठरली. मूल्यांकन करणाऱ्या संस्थांनी भारतातील गुंतवणुकीचे गुण वाढवल्याने गुंतवणूकदार देशाकडे वळले. वास्तविक त्यांचा विश्वास तेवढा दृढ नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात देशातील आर्थिक सुधारणा मंद गतीने होत असल्याबद्दल मुडीजनेदेखील चिंता व्यक्त केली होती. तर दुसरीकडे राजकोशीय घटदेखील वाढून २,८६,६९५ लाख कोटी रुपयांपर्यंत पाेहोचली आहे. जी वर्षभराच्या उद्दिष्टापैकी ५१.६ टक्के आहे. तसे पाहिले तर गेल्या वर्षी याच कालावधीतील २.९८ लाख कोटी रुपयांपेक्षा तो थोडा कमी आहे. असे असले तरी ही सरकारसाठी दिलासा देणारी बाब नाही, कारण आर्थिक प्रगतीला वेग देण्यासाठी सरकारला खर्चात वाढ करावी लागणार आहे. तसेच जास्त नुकसान अशा खर्चाला लगाम लावू शकते. उत्पादन क्षेत्रातून काही सकारात्मक आकडेवारी मिळाली असून जुलै महिन्यात यामध्ये वाढ झाली आहे. त्याला प्रभावी बनवण्यासाठी व्याजदर कमी करण्याची आवश्यकता होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदरात बदल केला नाही. याचा बाजारातील विचारावर परिणाम होणार आहे. एकूणच आर्थिक स्थिती तेवढी मजबूत नाही आणि बाजारात मुख्यत: नगदीची मात्रा वाढवणे आवश्यक आहे.

पुढील कालावधीत बघितले तर बँकिंग स्टॉक्स आणि बँक निफ्टीच्या नेतृत्वात शेअर बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातदेखील बँकिंग शेअरमुळे शेअर बाजारात मोठी वाढ झाली होती. वाढीचा विचार केल्यास निफ्टीला पहिला रेझिस्टन्स ८५६४ अंकांच्या जवळ मिळेल. मात्र, हा मजबूत रेजिस्टन्स नसेल. निफ्टी याच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. याला पुढचा रेजिस्टन्स ८६७२ अंकांच्या जवळ मिळेल. हा एक मजबूत रेजिस्टन्स असेल. या पातळीवर काही स्थैर्य दिसू शकते. मात्र, याचा बाजारावर काही परिणाम होणार नाही. अशा स्थितीत निफ्टीला पुढचा रेजिस्टन्स ८७२० अंकांच्या जवळ मिळेल. पडझडीच्या स्थितीत पहिला आधार ८४०८ अंकांच्या जवळ मिळेल. हा मध्यम आधार असेल, जर निफ्टी याच्या खालच्या पातळीवर बंद झाला तर त्याला पुढचा आधार ८३१३ अंकांच्या जवळ मिळेल. हा एक मजबूत आधार असेल, जो बाजाराची दिशा निश्चित करेल, तर निफ्टी या पातळीच्या खाली आला तर येणाऱ्या दिवसांत तो ८००० च्या पातळीच्या खाली जाण्याची शक्यता वाढेल. शेअरमध्ये या आठवड्यात टीसीएस आणि सन फार्मा चांगल्या स्थितीत दिसून येत आहे. टीसएसचा सध्याचा बंद भाव २,५०८.९० रुपये आहे. तो २,५४२ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो. याची नीचांकी पातळी २,३७४ रुपये आहे. सन फार्माचा बंद भाव ८३० रुपये आहे. तो ८४४ रुपयांपर्यंत वाढू शकतो, तर कमीत कमी ८१९ रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in