आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Companies Economik Results That Third Day Sensex Down

कंपन्यांच्या आर्थिक निकालामुळे सलग तिसऱ्या दिवशी आपटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळण्याची चिंता लागलेली असताना त्यात कंपन्यांच्या निरुत्साहजनक अार्थिक निकालाची भर पडल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी बाजारात विक्रीचा मारा झाला. सेन्सेक्स २८ हजार अंकांच्या पातळी खाली जात २३५ अंकांनी गडगडला. गेल्या दाेन अाठवड्यांतील ही सर्वात नीचांकी बंद पातळी अाहे.
जीएसटी अाणि अन्य महत्त्वाच्या विधेयकांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळण्याची शक्यता धुसर वाटू लागली अाहे. त्यातच चीनच्या युअान चलनच्या अवमूल्यनामुळे जगभरातील शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण निर्माण झाले. या सर्व घडामोडींचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांिगतले.
जूनअखेर संपलेल्या तिमाहीतील निराशाजनक कामगिरीमुळे स्टेट बँक, टाटा स्टील, हिंदाल्काे अाणि काेल इंिडया या समभागांवर विक्रीचा ताण अाला. त्यामुळे निफ्टीने ८,५०० अंकांची पातळी साेडली. युअानच्या अवमूल्यनाबराेबरच डाॅलरच्या तुलनेत रुपयादेखील ४० पैशांनी कमकुवत झाल्यामुळे बाजारावर परिणाम झाला. Companies aarthika nikalamulee the third day in a rowसकाळच्या सत्रात २८,२०५.१२ अंकांच्या कमाल पातळीवर गेला हाेता. परंतु दिवसअखेर ताे २३५.६३ अंकांनी घसरून २७,८६६.०९ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

जीएसटी विधेयकाबाबत केंद्र सरकारने पुढचे पाऊल
टाकल्यानंतर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाली. त्यामुळे गुंतवणूूकदारांचा मूड गेला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स ४३२.०४ अंकांनी गडगडला अाहे. विक्रीचा ताण अाल्याने निफ्टीदेखील ६३.२५ अंकांनी घसरून ८४६२.३५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

चलनाचे अवमूल्यन
चीनच्या चलनाचे अवमूल्यन झाल्याचा धातू समभागांवर परिणाम हाेऊन जगभरातील शेअर बाजारांत धातू समभाग अापटले. पीएनबी, बँक अाॅफ बडाेदा, टाटा स्टील, हिंदाल्काे, काेल इंिडया, वेदांत िल. या समभागांमुळे सेन्सेक्सची पडझड हाेत राहिली.