मुंबई - रिझर्व्ह बँकेने अार्थिक सुधारणांबाबत घेतलेला सावध पवित्रा, डाॅलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, अपु-या पावसाच्या अंदाजानंतर भांडवल बाजारातून बाहेर जात असलेला विदेशी निधीचा अाेघ अादी विविध कारणांमुळे शेअर बाजारात अत्यंत चढ-उताराच्या वातावरणामध्ये व्यवहार झाले. सकाळच्या सत्रात चांगली खरेदी हाेऊनदेखील नंतर झालेल्या विक्रीच्या मा-यात
सेन्सेक्स २४ अंकांनी घसरला. सलग तिस-या दिवशी बाजाराने घसरणीचा सूर कायम ठेवला.
हवामान खात्याने यंदाच्या वर्षात अपुरा पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यामुळे दुष्काळ पडण्याची भीती बाजाराला वाटू लागली अाहे. याचा कंपन्यांच्या नफ्यावर तसे इंधन महागाईवर परिणाम हाेण्याची चिंता निर्माण झाली अाहे. त्यामुळे बाजारात विक्रीचा जाेर वाढल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,९४०.६४ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. गेल्या दाेन सत्रांत विक्रीचा फटका बसलेल्या काही बड्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी करण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिल्यामुळे दिवसभरात सेन्सेक्स अाणखी २६,९४८.८४ अंकांच्या कमाल पातळीवर गेला; परंतु नंतर झालेल्या नफारूपी विक्रीत अगाेदर केलेली सर्व कमाई धुऊन निघाली अाणि सेन्सेक्स २६,५५१.९७ अंकांच्या नीचांकी पातळीवर अाला. बड्या समभागांच्या खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये सुधारणा झाली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स २३.७८ अंकांनी घसरून २६,८१३.४२ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
निफ्टी नीचांकी पातळीवर
गेल्या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्स १०३५.५७ अंकांनी घसरला अाहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांक ८१,०० अंकांच्या खाली गडगडत ८०५६.७५ अंकांच्या नीचांकी पातळीवर अाला; परंतु नंतर कामकाजाच्या अखेरच्या सत्रात खरेदीचा जाेर वाढल्यामुळे िनफ्टीने ताेटा भरून काढला. त्यामुळे िनफ्टीचा िनर्देशांक िदवसअखेर ४.४५ अंकांनी घसरून ८१३०.६५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
रुपया घसरला
चलन बाजारात रुपयादेखील ६४ च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली गेला. डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६४.२५ अशा २० महिन्यांच्या खालच्या पातळीवर अाले. अाशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण युराेप शेअर बाजारातील मरगळ याचाही बाजारावर परिणाम झाला.
टाॅप लुझर्स : वेदांत, हिंदाल्काे.
टाॅप गेनर्स : रिलायन्स, विप्राे, एचडीएफसी, एचडीएफसी बँक.