आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Continuously Sacond Day Sen Sex And Nifty Increase

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टीत वाढ, बाजार ०.४० टक्क्याच्या तेजीसह बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी देशातील बाजारात तेजी दिसून आली. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे देशातील बाजार ०.४० टक्क्याच्या तेजीसह बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅपसोबतच राष्ट्रीय शेअर बाजारातील ऑटो, एफएमसीजी आणि रिअॅल्टी इंडेक्समध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त तेजी राहिली.

व्यवहाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स १०४ अंकांनी वाढून २५,८६४ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी ३१ अंकांनी वाढून ७८३७ च्या पातळीवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये चांगले खरेदीचे वातावरण दिसून आले. निफ्टीचा मिडकॅप १०० इंडेक्स ०.६ टक्के वाढून १२,९५९.५ च्या पातळीवर बंद झाला, तर मुंबई शेअर बाजारातील स्मॉलकॅप इंडेक्स ०.५ टक्के वाढीसह ११,२३३.५ च्या पातळीवर बंद झाला.

मेटल इंडेक्स वाढले: एफएमसीजी, मेटल, फार्मा आणि ऑटो इंडेक्समध्ये २.२ ते ०.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि बँकिंग शेअरमध्ये विक्रीचा मारा दिसून आला.