आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची सलग दुस-या दिवशी चढती कमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डेरिव्हेटिव्हज व्यवहारांच्या शेवटच्या दिवशी बाजारात व्यवहारांचा वेग वाढला. त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू अाणि सेवा कर विधेयकात सुधारणा करण्यास मंजुरी दिल्यामुळे बाजारात अाणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात दणकून खरेदी केल्यामुळे सेन्सेक्समध्ये सलग दुस-या दिवशी १४२ अंकांनी वाढ झाली. जुलैमधील फ्यूचर अँड अाॅप्शन व्यवहारांचा शेवटचा दिवस असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सलग दुस-या दिवशी समभाग खरेदी क्रम कायम ठेवला. निधी संस्थांनी केलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स दिवसभरात २७,८५४.४६ अंकांच्या कमाल पातळीवर गेला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये १४१.९२ अंकांची वाढ हाेऊन ताे २७,७०५.३५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ८४०० अंकांच्या कमाल पातळीच्या पुढे म्हणजे ८४५८.९० अंकांपर्यंत गेला.दिवसअखेर निफ्टीमध्ये ४६.७५ अंकांची वाढ हाेऊन ताे ८४२१.८० अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला.