आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Decline In The Country's Stock Of Foreign Currency

देशाच्या विदेशी चलन साठ्यात १५ कोटी डॉलरची घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या विदेशी चलन साठ्यात २० नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात १४.९७ कोटी डॉलरची घट झाली असून आता भारताकडे ३५२.३६५७ अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी असल्याची नोंद आहे. जे २३,१७५ अब्ज रुपयांच्या बरोबरीत आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या मते, विदेशी मुद्रा भांडार डॉलरमध्ये सांगितले जाते, यावर भांडारात असलेल्या पाउंड, स्टर्लिंग, येन यांसारख्या आंतरराष्ट्रीय चलनाच्या मूल्यांमधील चढ-उताराचा सरळ परिणाम होत असतो. गेल्या आठवड्यात देशातील सुवर्ण भांडारमूल्यात कोणत्याही प्रकारला बदल न होता ते १८.६९१८ अब्ज डॉलरवर कायम होते, जे १,२१९.१ अब्ज रुपयांच्या बरोबरीत आहे. या दरम्यान, देशातील विशेष निकासी अधिकार (एसडीआर)चे मूल्य १२२ कोटी डॉलरवरून घटून ३.९८६३ अब्ज डॉलर झाल्याची नोंद झाली होती, जे २६३.५ अब्ज रुपयांच्या बरोबरीत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये देशातील सध्याच्या भांडाराचे मूल्य ४० लाख डॉलरने घटून १.२९२३ अब्ज डॉलरवर आल्याची नोंद करण्यात आली, जी ८५.४ अब्ज रुपयांच्या बरोबर आहे.