आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disappointed The Stock Market, The Sensex Has Lost

शेअर बाजारात निराशा, सेन्सेक्स १८९ ने घसरला, पुन्हा २८ हजारांखाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अगाेदरच्या दाेन सत्रांमध्ये चांगली कमाई केल्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरणीचा हंगाम सुरू झाला. घसरलेली निर्यात अाणि रुपयाचे अवमूल्यन याचे निमित्त हाेऊन साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजारात विक्रीचा मारा हाेऊन सेन्सेक्स १८९ अंकांनी गडगडला.

संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जीएसटी विधेयकाबाबत पुढे काेणतीच प्रगती न झाल्यामुळे काही बड्या समभागांची चकाकी गेली. जूनअखेर संपलेल्या तिमाहीत कंपन्यांचे अार्थिक निकाल फारसे उत्साहजनक नसल्यानेदेखील बाजाराचा मूड गेला. सतत घसरत असलेला रुपया तसेच चीनच्या चलनाचे अवमूल्यन या सगळ्या गाेष्टींचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडून ही नंतर विक्रीच्या माऱ्यात अडकला.

देशाची निर्यात जुलैमध्ये १०.३ टक्क्यांनी घसरून ती २३.१३ अब्ज डाॅलरवर गेली असून व्यापार तूट वाढून १२.८१ अब्ज डाॅलरवर गेली अाहे. सलग अाठव्या महिन्यात निर्यातीचा अालेख घसरता राहिल्यामुळे बाजाराच्या चिंतेत अाणखी भर पडली. राष्ट्रीयीकृत बँकांना नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने सात कलमी धाेरण जाहीर केल्यामुळे बँक समभागांना चांगली मागणी अाली. सिप्ला, हिंदाल्काे, अाेएनजीसी, हिराे माेटाेकाॅर्प या समभागांना माेठा फटका बसला. विक्रीच्या माऱ्यात स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, तेल अाणि वायू समभागांना फटका बसला.
निफ्टीतही घसरण
गेल्या दाेन सत्रांमध्ये सेन्सेक्सने ५५०.०५ अंकांची कमाई केली हाेती. परंतु साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स विक्रीच्या माऱ्यात २७,७३९.१३ अंकांच्या खालच्या पातळीपर्यंत गेला हाेता. परंतु नंतर त्यात सुधारणा हाेऊन २७,८७८.२७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तरीही दिवस अखेर सेन्सेक्स १८९.०४ अंकांनी घसरला. निफ्टीचा निर्देशांकदेखील ८५०० अंकांच्या पातळीखाली गेला. निफ्टी १८९.०४ अंकांनी घसरून ८४७७.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला.