आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात सलग चौथ्या दिवशी पडझड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनने चलनाचे अवमूल्यन केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव निर्माण झाला आहे. त्यातच संसदेत जीएसटी विधेयक मंजूर होण्याची आशा कमी दिसत असल्याने बुधवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळाली. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी बाजार पडझडीसह बंद झाला.
बुधवारी सेन्सेक्स ३५४ अंक म्हणजेच १.२७ टक्के पडून २७,५१२ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी १०९ अंक म्हणजेच १.२८ टक्के पडून ८३५४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. ३० शेअर्सच्या यादीतील २३ शेअर्स पडझडीसह बंद झाले.

बुधवारी झालेल्या पडझडीत सर्वात जास्त व्हिडिओकॉनचे शेअर ८.०३ टक्क्यांनी पडून बंद झाले. तर हिंदाल्कोचे ७.२१ टक्के, कोल इंडिया ५.५३ टक्के, एसबीआय ४.७७ टक्के पडझडीसह बंद झाले.