आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Crud Oil, Banking Sector Share Market Come Down

शेअर बाजारात कच्चे तेल, बँकिंग क्षेत्रामुळे घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबई शेअर बाजारात सोमवारी आलेल्या जोरदार तेजी नंतर मंगळवारी बाजारात घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशक सेन्सेक्स ३६२ अंकांनी घसरून २३,१९२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ११५ अंकांच्या घसरणीसह ७०४८ च्या पातळीवर बंद झाला. कच्चे तेल उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये उत्पादन बंद करण्यावर सहमती झाली आहे, त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असल्याचे मत मायस्टॉकरिसर्चचे प्रमुख लोकेश उप्पल यांनी व्यक्त केले. तथापि एसबीअाय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पुढील तिमाही निकालात बँकांचा एनपीए आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे देशातील शेअर बाजारात जोरदार घसरण आल्याचे मत उप्पल यांनी मांडले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक िनफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० पैकी ४१ समभागांमध्ये जोरदार विक्रीचा मारा झाला. एसबीआय ७ %, बँक आॅफ बडोदा ६ %, पीएनबी ५% आणि वेदांता लिमिटेड ५ टक्के घसरणीसह बंद झाले.

सर्वच क्षेत्रांत घसरण
राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांत मंगळवारी घसरण नोंदवण्यात आली. सर्व प्रमुख निर्देशांकांत एक ते सहा टक्क्यांची घसरण झाली. बँक निफ्टी दोन टक्क्यांच्या घसरणीसह १४,१६६ च्या पातळीवर आला. सरकारी बँकांचा निर्देशांक सहा टक्क्यांनी घसरून २,०२३ च्या पातळीवर आला आहे.